Mumbai Crime : रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलीस पोहोचले ‘युपी’मध्ये
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेश (यूपी) येथून अटक केली. आरोपी हा यूपीचा रहिवासी आहे. तो मुंबईत राहत असून, ऑटोचालक म्हणून काम करतो.
ADVERTISEMENT
Mumbai crime news in marathi : मुंबईत ऑटोमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेश (यूपी) येथून अटक केली. आरोपी हा यूपीचा रहिवासी आहे. तो मुंबईत राहत असून, ऑटोचालक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित सिंग असे आरोपीचे नाव आहे. महिलेवर बलात्कार करण्यापूर्वी त्याने मारहाणही केली होती. त्याचबरोबर याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली होती.
ADVERTISEMENT
प्रकरण कसे उघडकीस आले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही दिवसांनंतर 20 वर्षीय महिलेच्या पोटातून रक्त येऊ लागले. दोन महिन्यांपूर्वी ऑपरेशननंतर महिलेची प्रसूती झाली होती. महिलेला रक्तस्त्राव सुरू होताच कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. जखमेच्या खुणा पाहून डॉक्टरांनी महिलेची विचारपूस केली, त्यानंतर तिने डॉक्टरांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी जवळच्या आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वाचा >> Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?
आरोपींना निर्जनस्थळी नेले
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पीडिता सीबीडी-बेलापूर येथे मावशीच्या घरी गेली होती. तेथून महिलेने गोरेगाव येथील आपल्या घरी परतण्यासाठी नवी मुंबईपर्यंत ऑटो बुक केला. ऑटोमध्ये बसून महिला आरे कॉलनीत पोहोचली तेव्हा रिक्षाचालकाने तिला एका निर्जनस्थळी नेले.
हे वाचलं का?
घटनेनंतर यूपी पळून गेला
महिलेला एका निर्जनस्थळी नेल्यानंतर आरोपी इंद्रजीतने आधी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने महिलेला याबाबत कोणाला सांगितल्यास वाईट होईल, अशी धमकीही दिली होती. घटनेनंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर इंद्रजित मुंबईतूनही पळून गेला आणि उत्तर प्रदेशात लपला होता.
वाचा >> Kamakumar Nandi Maharaj : बेपत्ता जैन मुनीची हत्या! काय आहे हत्येमागचं नेमकं कारण?
पोलिसांनी मालकाची केली चौकशी
महिलेच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना पोलिसांनी ऑटो मालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. ऑटो मालकाने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी दुसरा कोणीतरी ऑटो चालवत होता. यानंतर ऑटो मालकाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस आता इंद्रजितला न्यायालयात हजर करणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT