औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून भयंकर हत्याकांड! तरुणाला बेदम मारलं अन् जिवंत असतानाच फेकलं विहिरीत
औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरूणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मृत तरूणाला त्याच्या कुटुंबियांसमोर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर आरोपींनी तरूणाला जिवंत विहिरीत फेकून दिले होते.
ADVERTISEMENT
औरंगाबादमधून (Aurangabad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत प्रेमप्रकरणाच्या (Love Affair) संशयातून एका तरूणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मृत तरूणाला त्याच्या कुटुंबियांसमोर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर आरोपींनी तरूणाला जिवंत विहिरीत फेकून दिले होते. यामध्ये तरूणाला पोहता न आल्याने त्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. नारायण रतन पवार (वय 22) असे या तरूणाचे नाव आहे. तरूणाच्या हत्येची ही संपूर्ण घटना त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यादेखत घडली आहे.या घटनेने आता परीसरात हळहळ व्यक्त होतं आहे. (young boy murder in love affair shocking crime story on aurangabad)
ADVERTISEMENT
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील खातखेडाच्या बामणवाडीत ही घटना घडली आहे. मृत नारायण पवारच्या घरासमोरच आरोपींचे कुटुंब राहते. गेल्या रविवारी 6 ऑगस्टला काकुळते कुटुंबातील एक लहान मुलगा चिठ्ठी घेऊन आला आणि पवार कुटुंबाच्या दारात फेकून निघून गेला होता. घरासमोर पडलेली चिठ्ठी नारायणने उचलली आणि आई-वडिलांसमोरच वाचायला सुरूवात केली. या चिठ्ठीतून प्रेम पत्र लिहण्यात आले होते. काकुळते कुटुंबातील एका तरूणीने नारायणला हे पत्र पाठवले असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : Crime: आईचे 21 वर्षीय तरूणासोबत संबंध, मुलीनेच…
या चिठ्ठीवरून नारायणच्या कुटुंबियांनी संबंधित कुटुंबियांच्या घरी जाऊन या घटनेचा जाब विचारला असता तरूणीने मी अशा आशयाची कोणतीच चिठ्ठी पाठवली नसल्याची माहिती दिली होती. या चिठ्ठीवरून दोन्ही कुटुंबियांमध्ये मोठा वाद झाला, आणि काही तासांनी हा वाद मिटला देखील.
हे वाचलं का?
लाठ्या-काठ्यांनी घरावर हल्ला
रविवारी वाद मिटल्यानंतर सोमवारी सायंकाळी तरूणीच्या कुटुंबियांनी नारायण पवारचे घर गाठले. यावेळी नारायणने दार उघडताच त्याच्यासमोर हातात काठी घेऊन प्रवीण काकुळते उभे होते, तर त्याच्यामागे संपूर्ण कुटुंब लाठ्या-काठ्या घेऊन होते. दरम्यान काकुळते यांनी नारायणला घराबाहेर खेचत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करायला सुरूवात केली. नारायणच्या कुटुंबियांनी त्याला वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला,मात्र काकुळते यांच्यासोबत इतके जण होते की, त्यांना नारायणला त्यांच्या तावडीतून सोडवताच आले नाही. आणि पुढे जाऊन काकुळते कुटुंबियांनी नारायणला जिवंत विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली. यामध्ये नारायणला पोहता येत नसल्याने त्याचा बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेने आता पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : Kalyan Crime: 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आरोपी म्हणाला, ‘देवाने चार मुली दिल्या, पण…’
विशेष म्हणजे एका क्षुल्लक चिठ्ठीवरून ही संपूर्ण घटना घडली आहे. या प्रकरणात दोघांमध्ये प्रेमप्रकरण होते की नाही, याबाबही अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी आता पवार कुटुंबियांनी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढला आहे.तसेच पोलिसांनी या प्रकरणी एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर 11 जणांना अटक केली. या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT