Ajit Pawar : 'ही जागा राष्ट्रवादीची होती, पण...', परभणीत अजित पवार काय म्हणाले?
Parbhani Lok Sabha Constituency, Mahadev Jankar : ''महादेव जानकरांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आहे. कुठेही शेतकऱ्याची खोली किंवा खोपट मिळाली तरी त्या खोपटात महादेव जानकर झोपू शकतात, तिथेच अंघोळी करू शकतात. तिथेच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. असे अजित पवारांनी सांगितले.
ADVERTISEMENT

Parbhani Lok Sabha Constituency, Mahadev Jankar : महायुतीच्या जागावाटपात परभणीची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. या जागेवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे जानकरांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. यानिमित परभणीत झालेल्या महायुतीच्या विजय संकल्प सभेत बोलताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीची जागा जानकरांसाठी का सोडली? यामागचे कारण सांगितले. (ajit pawar on parbhani lok sabha seat mahadev jankar filled nomination form mahayuti vijayi sankalp sabha)
परभणीत महायुतीच्या विजय संकल्प सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, 'ठिक आहे ही जागा राष्ट्रवादीची होती. पण आम्ही बहुजनांचा प्रतिनिधीत्व करणारे लोक आहोत. तसेच उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधीत्व द्यायचं असतं. वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं.शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे. इथे शिकवण शिवाजी महाराजांचे आहे, असे पवारांनी सांगितले.
हे ही वाचा : शिवसेनेने नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..
''महादेव जानकरांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आहे. कुठेही शेतकऱ्याची खोली किंवा खोपट मिळाली तरी त्या खोपटात महादेव जानकर झोपू शकतात, तिथेच अंघोळी करू शकतात. तिथेच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात,असे अजित पवारांनी सांगितले.
'देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते. तरी देखील बारामतीला आल्यावर मला लोकं सांगायची. दादा कॅबिनेट मंत्री आहेत, परंतू तिथे आमच्यात झोपतात,आमच्यात भाकरी खातात, आमच्यात चर्चा करतात आणि लोकांची सुख दुख समजून घेण्याचा प्रयत्न करतात.अशा प्रकारचा उमेदवार आम्ही तुम्हाला दिला आहे, त्यामुळे या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : "ठाकरे-पवारांना याची उत्तरे द्यावी लागतील"
तसेच ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. त्या या निवडणुकीकडे आपण त्या अँगलने बघितले पाहिजे. मागे ज्याला उमेदवार (संजय जाधव) म्हणून निवडून दिले, त्यांनी 10 वर्षात काय दिवा लावला, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. आणि उद्या 5 वर्षात महादेव जानकर आपलं नेतृत्व करणार आहेत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.