Pune News : वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू! बेजबाबदार डॉक्टरवर गुन्हा दाखल
Pune Dinanath Mangeshkar Hospital Update : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका स्त्री रोग तज्ज्ञांवर बेजाबदारपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत समोर आली मोठी अपडेट

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा झाला मृत्यू

त्या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल
Pune Dinanath Mangeshkar Hospital Update : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका स्त्री रोग तज्ज्ञांवर बेजाबदारपणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर आरोप करण्यात आले. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससून रुग्णालयाच्या रिपोर्ननुसार, गंभीर अवस्थेत असलेल्या भिसे यांना रुग्णलयात दाखल करण्यापूर्वी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु, भिसे यांच्या कुटुंबियांना डिपॉझिटचे पैसे तातडीने उपलब्ध करता आले नाहीत. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने भिसे यांच्यावर उपचार केले नाहीत.
भिसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात पाच तास वाट पाहिली. परंतु, रुग्णालयात भिसे यांच्यावर उपचार केले गेले नाहीत. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात ट्रान्सफर केलं. तिथे त्या महिलेनं जुडवा मुलींना जन्म दिला. पण काही वेळानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला.
हे ही वाचा >> UPSC Result 2024 Shakti Dubey: UPSC परीक्षेत संपूर्ण देशात पहिली आलेली 'शक्ती' आहे तरी कोण?
ससून रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात डॉ. घैसास यांना याप्रकरणी जबाबदार असल्याचं ठरवलं. पुण्याती या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. भाजप नेते अमित गोरखे यांनी आरोपी डॉक्टरचं मेडिकल लायसन्स रद्द करण्यासोबतच कडक कारवाईची मागणी केली.
नेमकं काय घडलं होतं 'त्या' दिवशी?
तनिषा भिसे या 29 वर्षीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तनिषा या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता तनिषा यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्या जुळ्या मुलांची आई होणार होत्या, आणि त्यांची प्रकृती गंभीर होती.