Lok Sabha Election 2024 : बच्चू कडूंचा महायुतीवर मोठा 'प्रहार', अकोल्यात काँग्रेसला देणार पाठिंबा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

akola lok sabha election 2024 bachhu kadu support akola seat congress candidate dr abhay patil prahar janshakti parti amaravati lok sabha navneet rana
अकोल्यातही काँग्रेसला पाठिंबा द्यायची तयारी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने सुरु केली आहे.
social share
google news

Bacchu Kadu Support Akola Seat : धनंजय साबळे, अकोला : अमरावती लोकसभा मतदार संघातून महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी रामटेकमधून काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. या पाठिंब्यानंतर आता अकोल्यातही काँग्रेसला पाठिंबा द्यायची तयारी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाने सुरु केली आहे. या संदर्भातला निर्णय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आता हा प्रस्ताव बच्चू कडूंना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे.  (akola lok sabha election 2024 bachhu kadu support akola seat congress candidate dr abhay patil prahar janshakti parti amaravati lok sabha navneet rana)  

ADVERTISEMENT

अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना बच्चू कडू यांचा विरोध आहे. या विरोधातूनच त्यांनी अमरावतीतून प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. बच्चू कडू त्यासाठी जोमाने प्रचारालाही लागले आहेत. नवनीत राणांवर दिवसेंदिवस शाब्दीक हल्लाही करत आहेत. त्यात आता रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर आणखीण एका जागेवर काँग्रेसला प्रहारचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : शरद पवारांची साथ का सोडली? खडसेंनी सांगितला घटनाक्रम

आमच्या नेत्याला अमरावतीतून भाजपकडून सन्मान मिळत नाही आहे. अकोल्यात सुद्धा आम्हाला आमदार रणधीर सावरकर व त्यांच्या भाजप पक्षाकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही अकोल्यातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याचा ठराव पास केल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आता हा ठराव प्रहारचे कार्यकर्ते बच्चू कडू यांना उद्या पाठवणार आहोत. कार्यकर्त्यांनी घेतलेला ठराव त्यांनाही मान्य असेल, असा विश्वास प्रहारच्या कार्यकर्त्यांना आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 दरम्यान बच्चू कडूच्या प्रहार संघटनेने रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.  अमरावतीमध्ये भाजपच्या विरोधात आपला उमेदवार उतरवला आहे. आता अकोल्यातही महाविकास आघाडीच्या  काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास महायुती आणि शिंदेंसाठी हा मोठा धक्का असणार आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा 'हा' नेता निवडणूक लढवण्यास तयार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT