प्रेमात अडकवलं, लग्नाचं आमिष दाखवून पुण्यात आणलं आणि बुधवार पेठेत विकलं... तरूणीसोबत काय घडलं?

मुंबई तक

Pune News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचा रहिवासी शफीउल अबुल नासूर वाहिद आलम याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्याने तरूणीला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात समोर आला धक्कादायक प्रकार

point

आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश

point

तरूणीने केले धक्कागायक आरोप

Pune Crime News : पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसाममधील एका 25 वर्षीय तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पुण्यातील बुधवार पेठेतील 5 लाखाला विकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच यामध्ये वेश्यागृहाचा मालक आणि एका अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

हे हीव वाचा >> पाकिस्तानने ताश्कंद करार रद्द केला तर काय होईल? करारामध्ये कोणत्या मुद्द्यांचा उल्लेख?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचा रहिवासी शफीउल अबुल नासूर वाहिद आलम याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर त्याने तरूणीला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं. जानेवारी 2025 मध्ये त्याने तिला पुण्यात आणलं. त्यानंतर आरोपीने तरूणीला थेट बुधवार पेठेतील वेश्यागृहात 5 लाख रुपयांना विकलं. यानंतर पापा शेख आणि अधुरा शिवा कमली या मध्यस्थांनी तिला धमकावून वेश्याव्यवसायात ढकललं. तसंच, आरोपींशी संबंधित एका अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत आहे.

हे हीव वाचा >> Pehalgam मधील हल्ल्यानंतर BCCI चे ICC ला पत्र, पाकिस्तानसोबतच्या सामन्याबद्दल काय म्हटलंय?

दरम्यान, चार महिने हा छळ सहन केल्यानंतर पीडितेने कसंबसं पलायन करून पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी इमॉरल ट्रॅफिकिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PITA) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अजित जाधव तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाने पुण्यातील मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या काळ्या बाजारावर पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp