Chhagan Bhujbal : 'तुम्ही रक्ताचे ना? मग बाळासांहेबांसोबत असं का केलं?' भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
Chhgaan Bujbal Reply Raj Thackeray : ''राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जसा प्रश्न विचारला तसाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडी लावून का बसतोय?
ADVERTISEMENT
Chhagan Bujbal Reply Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यानंतर आता राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घ्यायला सुरुवात केली आहे. अशाच एका सभेतून राज ठाकरे यांनी 'बाळासाहेबांची साथ सोडणाऱ्या छगन भुजबळांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात,' असी जहरी टीका उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली होती. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या टीकेला आता अजित पवारांच्या राट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhgaan Bujbal) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (chhagan bhulbal reply raj thackeray on udhhav thackeray criticslok sabha election 2024 mahayuti rally)
ADVERTISEMENT
छगन भुजबळ यांची झी 24 तासने मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत भुजबळ यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे. ''राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जसा प्रश्न विचारला तसाच प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारला पाहिजे. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडी लावून का बसतोय? हे राज ठाकरेंनी विचारलं पाहिजे.
हे ही वाचा : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? ठाकरेंनी सांगितला आकडा
माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात. पण मी तरी एक शिवसैनिक असेन.कदाचित फार कट्टर नाही असं समजून चला. पण तुम्ही रक्ताचे आहात ना? असा सवाल देखील भुजबळांनी राज ठाकरे यांना केला. तसेच राज आला नाही, राज आला नाही म्हणून तिकडे मातोश्रीवर लोकं जेवायची नाही. असं असताना तुम्ही असं का केलं बाळासाहेबांसोबत? तुम्ही तर इकडे पण असता तिकडे पण असता, असा टोला देखील भुजबळांनी लगावला.
हे वाचलं का?
भुजबळ पुढे म्हणाले, चला जाऊ द्या, माझ्यादृष्टीने हा मुद्दा संपला आहे. कारण लोकांनाही हा मुद्दा फारसा भावला नाही. मी जसं उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसलो होतो. तसं आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : "मोदींनी गडकरींनाही उडवून लावलं", मोदींच्या कॅबिनेटमधील किस्से
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT