Maharashtra Exit Poll: ठाकरे-शिंदेंची उडणार झोप! इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाचा खळबळ उडवणारा पोल
India Today- Axis My India Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएला मोठं यश मिळत असल्याचं इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार दिसतंय.
ADVERTISEMENT
India Today- Axis My India Exit Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चं मतदान अखेर आज (1 जून) पार पडलं. मतदानाचा शेवटचा आणि सातवा टप्पा आज संपन्न झाला आहे. त्यानंतर देशात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल हे समोर येत आहे. आता India Today- Axis My India चा महाराष्ट्रातील एक्झिट पोल हा समोर आला आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीला जोरदार झटका बसत असल्याचं दिसत आहे. तर भाजपप्रणित एनडीएला चांगलं यश मिळत असल्याचं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Exit Poll Result 2024 Live: इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचा महाराष्ट्रातील एक्झिट पोल जसाच्या तसा..
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात.
- भाजप - 20-22
- शिवसेना (शिंदे गट)- 8-10
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 1-2
असा अंदाज इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ ठरणार, शिंदे- अजित पवारांचं काय?
दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळत नसल्याचं दिसतं आहे. त्यांच्या आघाडीला केवळ 16 ते 20 जागाच मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- काँग्रेस - 3-4
- शिवसेना (ठाकरे गट)- 9-11
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 3-5
याशिवाय 0-2 जागा या अपक्षांना मिळू शकता असा अंदाजही इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!
जर या एक्झिट पोलचा आपण विचार केल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही फारशी यशस्वी होत नसल्याचं दिसतं आहे. 2014 आणि 2019 साली महाराष्ट्रात भाजप-एनडीएला चांगलं यश मिळालेलं. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत एनडीएला 40 हून अधिक जागा मिळालेल्या. त्या तुलनेत यंदा एनडीएच्या जागांमध्ये घट होताना दिसते आहे. मात्र, फारसा फटका बसत नसल्याचं दिसतं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात एनडीएला 8 ते 10 जागांचा फटका बसू शकतो असा अंदाज हा एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे. त्यामुळे आता निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला कोणाच्या पारड्यात जनतेने मतं टाकली आहेत हे स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT