Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे उमेदवार ठरले! ठाकरेंकडून 'या' जागा गेल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 congress 18 seat candidate declare nana patole congress core comittee meeting delhi maaha vikas aghadi
काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीत बैठक पार पडली
social share
google news

Lok Sabha 2024 Congress Maharashtra Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कोअर कमिटीची दिल्लीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत 18 जागांवर काँग्रेसची चर्चा झाली आहे. तर 15 जागेवर उमेदवार ठरल्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. या 15 जागांपैकी 8 उमेदवारांची नावे समोर आली आहे. या नावांची अद्याप काँग्रेसकडुन घोषणा करण्यात आली नाही. मात्र काँग्रेसकडून हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. हे उमेदवार नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.  (lok sabha election 2024 congress 18 seat candidate declare nana patole congress core comittee meeting delhi maaha vikas aghadi) 

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या 8 जागांवर उमेदवार 

प्रणिती शिंदे- सोलापूर
कोल्हापूर- शाहू महाराज 
रवींद्र धंगेकर - पुणे
विकास ठाकरे- नागपूर
शिवाजी काळगे- लातूर
वसंत चव्हाण- नांदेड 
केसी पाडवी - नंदुरबार
बळवंत वानखेडे -अमरावती

हे ही वाचा : Ajit Pawar : 'आम्ही आरेला कारे करु शकतो, पण...',

राज्यातील 18 जागेंवर आमची चर्चा झाली आहे. त्यापैकी 15 जागेवर उमेदवार ठरले आहेत.  उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आहेत. त्या बैठकीनंतरही काही जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर कशा जागा मिळतायत, कसे मेरीटच्या आधारावर निर्णय़ घेतले जातील, हे पाहावे लागेल, असे नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. 

हे वाचलं का?

कोल्हापूर आणि अमरावती या जागांवर शिवसेना काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. खरं तर अमरावतीतून शिवसेनेकडून गेल्यावेळी आनंदराव अडसूळ ती जागा लढले होते. आता अडसूळ शिंदे गटात आहेत. मात्र तरी ठाकरेंनी या जागेवर दावा सांगितला होता. मात्र आता त्या जागेवरून काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच कोल्हापूरच्या जागेवर देखील शिवसेनेचा दावा होता. मात्र काँग्रेसने शाहु महाराजांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा ठाकरेंच्या हातून गेल्या असल्याचे बोलले जात आहे. 

हे ही वाचा : MNS BJP Alliance : राज ठाकरेंची एन्ट्री, महायुतीत कुणाची जाणार विकेट?

सांगली आणि मुंबई या दोन जागांवरून शिवसेना काँग्रेसमध्ये वाद आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत नुकतेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या जागेवरून काँग्रेस शिवसेनेत पेच आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर देखील काँग्रेस-शिवसेनेने दावा सांगितला आहे. 

ADVERTISEMENT

गडचिरोली, रामटेक या मतदार संघावर अद्याप काँग्रेसने उमेदवार ठरवला नाही आहे.  भंडाऱ्यातून नाना पटोले लढण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप यावर पुर्णंत शिक्कामोर्तब झाला नाही आहे. चंद्रपुरमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार चर्चेत आहेत. प्रतिभा धानोरकर आणि विजय वड्डेटीवार यांच्या कन्या शिवानी वड्डेटीवार आहेत.  प्रतिभा चंद्रपुरमधुन प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर मल्लिकार्जुन खर्गेंनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अद्याप या जागेवर उमेदवार ठरण्यात आला नाही आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT