Nana Patole : सांगली, भिवंडीची जागा काँग्रेसने का सोडली?

प्रशांत गोमाणे

Nana Patole On Seat Sharing : महाराष्ट्रात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियंका गांधी यांचे दौरे आहेत. अशा वेळेस हा घोळ कायम राहिला तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतील. आणि कुठल्याही परिस्थितीत भापजला महाराष्ट्रातून पराभूत करायचं, अशी आमची भूमिका आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसने या दोन जागांवर माघार का घेतली?
lok sabha election 2024 maha vikas aghadi seat sharing nana patole congress loss sangali and bhiwandi seat udhhav thackeray maharashtra politics
social share
google news

Nana Patole On Seat Sharing: महाविकास आघाडीने आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जागावाटप जाहीर केले आहे. या जागावाटपात शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष 10 जागा लढणार आहेत. ज्या जागेवरून महाविकास आघाडीत पेच होता, ती सांगली आणि भिवंडीची जागा ठाकरेंना मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी आहे. असे असताना काँग्रेसने या दोन जागांवर माघार का घेतली? यामागचे कारण काय होतं? हे आता नाना पटोले यांनी सांगितले आहे. ( lok sabha election 2024 maha vikas aghadi seat sharing nana patole congress loss sangali and bhiwandi seat udhhav thackeray maharashtra politics) 

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पत्रकार परिषदेनंतर नाना पटोले यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ज्या जागा आम्ही मेरीटच्या आधारावर जिंकू शकतो. या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. सांगली, भिवंडी आणि मुंबईची जागा मिळावी यासाठी शेवटपर्यंत मीच किल्ला लढवला. पण हायकमांडच्या आदेशाचे पालन करावे लागते, असे नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले. 

हे ही वाचा : "भावाला बहिणीसोबत कपडे उतरवून...", मुनगंटीवार मोठ्या वादात

नाना पटोले पुढे म्हणाले, महाराष्ट्रात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियंका गांधी यांचे दौरे आहेत. अशा वेळेस हा घोळ कायम राहिला तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतील. आणि कुठल्याही परिस्थितीत भापजला महाराष्ट्रातून पराभूत करायचं, अशी आमची भूमिका आहे. अशा परिस्थितीत एक पाऊल मागे घेतलं म्हणजे आम्ही सगळे मागे गेलो असे नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले. 

विशाल पाटलांच्या नाराजीवर बोलताना पटोले म्हणाले, भिवंडी, मुंबई, सांगलीत जागांवर पुढच्या काळात न्याय देण्याचे काम केले जाईल. तसेच विशाल पाटलांना आम्ही समजवून सांगा. ही वेळ एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची नाही. भाजप सारख्या तानाशाहाला देशातून सत्तेतून बाहेर करण्याची आहे. त्यामुळे विशाल पाटलांनी आम्ही समजवून सांगू, असे नाना पटोले यांनी सांगितली. 

हे ही वाचा : ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटील थोपटणार दंड?

सांगलीत विश्वजित कदमांनी मोठं काम केले आहे. संघटना मजबूत केली. काँग्रेससाठी त्यांनी मोठी भूमिका घेतली. आम्हाला अपेक्षित होतं की ती सीट आम्हालाच मिळेल. अशावेळेस आमच्या तोंडचा घास हिसकावला गेला. म्हणून ते म्हणाले आमचं काय चुकलं, अशी भूमिका मांडली आहे, त्या मताशी मी ही सहमत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. पण ता ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टीवर चिंतन करण्याची गरज नाही. जी भूमिका आता हायकमांडने घेतली आहे, त्या भूमिकेलाच पुढे घेऊन गेले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp