"पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाला 50 लाख आणि..." मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई तक

CM Devendra Fadnavis : या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. यापूर्वी 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली

point

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत

point

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय घोषणा केली? वाचा...

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देश हादरला होता. या हल्ल्यात काही क्षणात अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलि वाहिली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय, या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवर विशेष लक्ष देण्याचं आश्वासनही त्यांनी दिले.

हे ही वाचा >> लेकानं स्वत:ला संपवलं, आईला पाहावलं नाही म्हणून तिनंही विष प्राशन केलं... बीड जिल्हा हळहळला, प्रकरण काय?

मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष घोषणा करताना सांगितलं की, पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसंच, या कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करेल. याच अनुषंगाने, जगदाले कुटुंबातील एका मुलीला सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव मागील चर्चेत ठरला होता. मात्र, आता मुख्यमंत्री विशेषाधिकाराचा वापर करत जगदाले कुटुंबातील मुलीला तात्काळ सरकारी नोकरी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.

या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. यापूर्वी 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली होती. तसेच, काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

हे ही वाचा >> आईस्क्रीम खाताना कॅफे मालकावर हल्ला, धडाधड गोळ्या घालून संपवलं, तपासातून उघड झालं धक्कादायक प्रकरण

मंत्रिमंडळ बैठकीत या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “हा दहशतवादी हल्ला मानवतेवर घाला घालणारा आहे. शहीदांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

हे वाचलं का?

    follow whatsapp