Survey: महाराष्ट्र भाजपला देणार आश्चर्याचा धक्का, नव्या ओपिनियन पोलचा कौल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Survey: महाराष्ट्र भाजपला देणार आश्चर्याचा धक्का, नव्या ओपिनियन पोलचा कौल
Survey: महाराष्ट्र भाजपला देणार आश्चर्याचा धक्का, नव्या ओपिनियन पोलचा कौल
social share
google news

Lok Sabha Elections 2024 Survey: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. टाइम्स नाऊ नवभारत या हिंदी वृत्तवाहिनीच्या जन गण का मन या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील आकडेवारी ही महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी आहे. यासोबतच इतरही अनेक राज्यातील अंदाज या सर्वेक्षणाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर. (lok sabha election 2024 maharashtra will give a surprise blow to the bjp according to a new opinion poll results of opinion polls of 4 states including gujarat maharashtra are shocking)

ADVERTISEMENT

टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेनुसार, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा या भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहेत. तेथे भाजपला 50 टक्के आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 46 टक्के असल्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा>> शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जाणार जड?

सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला सर्व 26 जागा मिळू शकतात. इथे भाजपला 60 टक्के मते मिळू शकतात, तर काँग्रेसला 32 टक्के आणि आम आदमी पार्टीला 3 टक्के मते मिळू शकतात. दरम्यान, हिमाचल प्रदेशातही सर्व 4 जागा भाजपच्या खात्यात जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपची मतांची टक्केवारी ही 56 टक्के असू शकते. तर काँग्रेसला 39 टक्के तर इतरांना 5 टक्के मते मिळू शकतात.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील नेमकी स्थिती काय?

सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 पैकी 36 जागा NDA आघाडीला जाऊ शकतात. ज्यापैकी 29 जागा या भाजपच्या खात्यात जातील असा अंदाज आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 5 तर अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, काँग्रेस फक्त एका जागेवरच विजयी ठरू शकते, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळू शकतात.

सर्व्हेनुसार, भाजपला सर्वाधिक 36 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 8 टक्के, अजित पवार समर्थकांना 4 टक्के, काँग्रेसला 8 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 21 टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 11 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> "असले प्रकार मला चालणार नाही", जयंत पाटलांनी दिला दम, भाषण व्हायरल

उत्तराखंडमध्ये भाजपला आघाडी?

उत्तराखंडच्या पाचही जागा भाजपच्या खात्यात जातील. तेथे भाजपला 55 टक्के, काँग्रेसला 36 टक्के आणि इतरांना 9 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार, उत्तर आणि मध्य भारतात इंडिया आघाडीला फारसं यश मिळत नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गोवा, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये एनडीए आघाडीला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT