Sharad Pawar: 'आपली खूण तुतारी वाजवणारा माणूस..', पवारांनी कोणाला केलं सावध?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

'आपली खूण तुतारी वाजवणारा माणूस..'
'आपली खूण तुतारी वाजवणारा माणूस..'
social share
google news

Lok Sabha Election 2024: अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी (शरद पवार) अत्यंत निर्णयाक अशी आहे. त्यातही बारामतीची निवडणूक ही त्यांच्यासाठी खूपच प्रतिष्ठेची आहे. पण मागील दोन दिवसापासून 'तुतारी' या चिन्हावरून बरंच राजकारण सुरू आहे. शरद पवारांच्या पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळालं आहे. पण बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला 'ट्रम्पेट' हे चिन्ह देण्यात आलं असून त्याचा प्रचार तुतारी म्हणून केला जात आहे. त्यामुळे बारामतीच्या नागरिकांमध्ये बराच संभ्रम पसरला आहे. पण हाच संभ्रम आता स्वत: शरद पवारांनी दूर केला आहे. (lok sabha election 2024 man who blowing tutari is our election symbol who did sharad pawar warn)

ADVERTISEMENT

शरद पवार यांची आज (25 एप्रिल) निलेश लंकेच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेतली. त्याच सभेत पवारांनी आपली खूण 'तुतारी फुकणारा माणूस' ही आहे. असं निष्ठून सांगितलं.. पुढे पवार असंही म्हणाले की, 'हे लोकं घोटाळे करण्यात फार हुशार आहेत..' 

'आपली खूण तुतारी फुकणारा माणूस..', पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले...

'निलेश लंके यांना मोठ्या मताने विजयी करा.. त्यांची खूण तुतारी वाजवणारा माणूस ही आहे.. पण त्याच्यातही या लोकांनी घोटाळा केलाय लक्षात ठेवा.. हे लोकं घोटाळे करण्यात फार हुशार आहेत. त्यांनी आणखी एक माणूस बीडचा उभा केलाय.. त्याला फक्त तुतारी चिन्ह दिलं. फक्त तुतारी.. माणूस नाही..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'आपली खूण काय तुतारी वाजवणारा माणूस.. माणूसही पाहिजे, तुतारीही पाहिजे.. यांनी काय निशाणी दिली फक्त तुतारी.. फक्त तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणार नाही.. दिल्लीला आवाज पोहचायचा असेल तर ती तुतारी फुंकली पाहिजे.. त्यासाठी माणूस पाहिजे. म्हणून तुतारी वाजवणारा माणूस ही खूण निलेश लंकेंची आहे.. त्याला मोठ्या मताने विजयी करा..' असं शरद पवार यावेळी म्हणाले. 

'तुतारी' चिन्हाचा नेमका वाद काय?

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला तुतारी निवडणूक चिन्ह दिल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे त्यांचा आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव घड्याळ हे चिन्हच देऊ केलं. तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे नाव आणि  महाराष्ट्राचे पारंपारिक वाद्य म्हणजे 'तुतारी वाजवणारा माणूस' हे निवडणूक चिन्ह दिलं.

हे ही वाचा>> Sangli Lok Sabha : "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार सोहेल युनूस शाह शेख यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह दिल्याने आक्षेप घेत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण, निवडणूक आयोगाने मंगळवारी त्यांची ही मागणी फेटाळून लावली.

ADVERTISEMENT

मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल- सुप्रिया सुळे

अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना दिलेल्या ट्रम्पेट या चिन्हासमोर मराठी अनुवाद 'तुतारी' हा मराठी अनुवाद लिहिला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.. असा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याकडून घेण्यात आला होता. ट्रम्पेटच्या चुकीच्या भाषांतरामुळे वाद निर्माण झाल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

ADVERTISEMENT

दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शरद पवार नावाच्या अपक्ष उमेदवाराने देखील फॉर्म भरला आहे. शरद राम पवार असे या व्यक्तीचे नाव आहे.

आता बारामतीतून 38 उमेदवार रिंगणात

बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 ते 19 एप्रिल होती. या कालावधीत 51 जणांनी उमेदवारी दाखल केले होते. या अर्जांची छाननी 20 एप्रिल रोजी झाली. छाननीत पाच अर्ज फेटाळण्यात आले असून 46 उमेदवारांचे अर्ज वैध घोषित करण्यात आले होते.

हे ही वाचा>> नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार, 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. तोपर्यंत आठ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले होते. अशा स्थितीत या जागेसाठी आता 38 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांची संख्या निश्चित केल्यानंतर अपक्ष उमेदवारांना मतदानासाठी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

अपक्ष उमेदवार युनूस यांनी मागितले होते ट्रम्पेट चिन्ह

यामध्ये युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराने प्राधान्याने ट्रम्पेट या चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेख यांना हे चिन्ह दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह 'तुतारी फुकणारा माणूस' आहे. त्यामुळे शेख यांना दिलेल्या निवडणूक चिन्हावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. पण आक्षेप नोंदविण्याची वेळ संपल्याचे कारण देत आयोगाने त्यांचा आक्षेप फेटाळून लावला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT