Sangli Lok Sabha : "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण
Vishwajeet Kadam Sangli Lok Sabha election : विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर विश्वजित कदम यांनी पहिल्याच भाषणात अनेक गौप्यस्फोट केले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विश्वजित कदमांचं सांगलीत भाषण
शिवसेनेसह मित्रपक्षातील नेत्यांवर टीकास्त्र
विशाल पाटलांच्या बंडानंतर विश्वजित कदमांचं पहिलं भाषण
Sangli Lok Sabha election : (प्रबोधिनी चिखलीकर, सांगली) विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर गुरुवारी (25 एप्रिल) काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा सांगलीत पार पडला. या मेळाव्यात विश्वजित कदमांनी काँग्रेसच्या नेत्यांसमोर खदखद व्यक्त केली. शिवसेनेने एकतर्फी उमेदवारी घोषित केल्याबद्दलची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.
ADVERTISEMENT
विश्वजित कदमांचं भाषण
"कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या. कुणी सांगितलं तुम्ही लोकसभा लढा. कुणी सांगितलं तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य द्या आम्ही ताकदीने काम करू. जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील काही नेत्यांनीही सांगितलं की, विश्वजित तुला लोकसभा लढावी लागेल."
हेही वाचा >> ...म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने विशाल पाटलांवर केली नाही कारवाई
"२०१९ मध्येही सांगितलं. २०२४ मध्येही सांगितलं. मी नम्रपणे सांगितलं. २०१९ ची माझी अडचण वेगळी होती. ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने १९८० च्या दशकात स्व. पतंगराव कदमांकडे काही नसताना साथ दिली, अशा माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं नव्हतं. म्हणून मी निर्णय कळवला की, मला विधानसभाच लढायची आहे."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कुणी आम्हाला विचारणार आहे का?
"२०१९ ची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचं सरकार झालं. मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मी नेहमी लोकांना सांगतो की, ती संधी पलूस कडेगावच्या लोकांना, सांगली जिल्ह्याला दिली होती. मी सांगलीत काम करत राहिलो. पाच वर्षात काय काय घडलं, हे कुणी आम्हाला विचारणार आहे का?", असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा >> "शपथेला नाही, खंजिराला महत्त्व", शरद पवारांचा बावनकुळेंनी काढला इतिहास
"गेल्या वर्षभरात आम्ही हा संघर्ष पेटवला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही मागणी करत होतो की, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी. आमच्या एका तरुण सहकाऱ्याला तयार केलं. त्याला विश्वास दिला. काळजी करून म्हणून सांगितलं. कुठल्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी ही विश्वजित कदमांची राहील, हा विश्वास मी त्या तरूण कार्यकर्त्याला दिला होता", असे विश्वजित कदम विशाल पाटलांबद्दल म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर
"पारदर्शकपणे, जुना इतिहास बाजूला ठेवून... आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकाऱ्याला दिली. तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं. जिल्हा काँग्रेस कमिटीतून आम्ही एक नाव पाठवलं. राज्यातून एक नाव गेलं. दिल्लीपर्यंत एक नाव पाठवलं. तुम्ही आनंद व्यक्त केला की खूप बरं वाटलं. काँग्रेस जिल्ह्यात एकसंघ ठेवली."
ADVERTISEMENT
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली, कुणी सांगितलं? कदमांचा रोखठोक सवाल
"तीन महिने जागा मागत होतो. महाविकास आघाडी झाली, ठीक आहे. देशात वातावरण फार विचित्र आहे. मविआ आज संघर्षात काम करतेय. महायुती कशी सत्तेत आली हे सगळं तुम्ही जाणून आहात. आणि म्हणून आपण एकास एक लोकसभा लढली पाहिजे म्हणून इंडिया आघाडी झाली."
"जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. सांगलीची जागा काँग्रेसची होती. पहिल्या दिवसापासून तुम्ही हो सांगत आलात. आम्ही आशा जागवल्या. आम्ही पेटून उठलो. मी कार्यकर्त्यांना सांगत गेलो की, सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला जाईल. नंतर काय झालं. मार्च एप्रिल जवळ आलं. कुणी सांगितलं की, कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज लढत आहेत. म्हणून ही जागा काँग्रेसला दिली जाईल", असा सवाल करत विश्वजित कदमांनी शिवसेनेबद्दलची नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT