Narayan Rane: 'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय X% मारली?', राणेंचा तोल सुटला!
Narayan Rane Criticize Uddhav Thackeray : कोकणातील जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. ज्या प्रकल्पात यांना पैसे मिळत नाहीत तेथे विरोध करण्याचं काम केलं. आणि आता उद्या, पर्वा येणार आहे, मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला. तु अडीच वर्षात काय X% मारली ते सांग ना? काय केल अडीच वर्षात तु? असा सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
ADVERTISEMENT
Narayan Rane Criticize Uddhav Thackeray : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मेला मतदान होणार आहे. यासाठी भाजप नेते नारायण राणे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. अशाच एका प्रचारसभेतून आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता हा (ठाकरे) उद्या, पर्वा येणार आणि मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणार आहे. पण तु अडीच वर्षात काय X% मारली ते सांग ना? असा सवाल करत नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. (narayan rane criticize udhhav thackeray ratnagiri sindhudurg lok sabha election 2024 vinayak raut)
ADVERTISEMENT
रत्नागिरीतील प्रचार सभेत नारायण राणे बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला होता. ''हा (ठाकरे) म्हणतो, अब की बार भाजपा तडीपार, अरे तू केवढा आहेस रे...पंतप्रधानाच नाव घेताना तुला काही जनाची, मनाची वाटत नाही का? कोकणातील जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. ज्या प्रकल्पात यांना पैसे मिळत नाहीत तेथे विरोध करण्याचं काम केलं. आणि आता उद्या, पर्वा येणार आहे, मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायला. तु अडीच वर्षात काय X% मारली ते सांग ना? काय केल अडीच वर्षात तु? कोकणात एक प्रकल्प आणलास? मुलांना नोकऱ्या दिल्यास? विकासाचा प्रकल्प आणलास. अतिवृष्टीच्या वेळेलाही एक रूपया देखील दिला नाही आणि येऊन इथे भाषण करतोय'', असा चिमटा देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.
हे ही वाचा : शरद पवारांची अभिजीत पाटलांनी सोडली साथ, माढ्यात किती धोका?
नाराणय राणे पुढे म्हणाले, योगा योगाने हिंदुत्वाशी गद्धारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मोदीना तडीपार करणार म्हणतो, तुझी ताकत किती, मोदींनी ठरवलं तर तुला तडीपार करू शकतात असा उघड इशारा देखील राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला. तसेच नारायण राणे यांनी संविधानावर देखील भाष्य करत काँग्रेसवर टीका केली.काँग्रेसने 500 वर्षात 80 वेळा संविधान बदलले आणि आमच्यावर आरोप करतात संविधान बदलणार करून, असा पलटवार राणेंनी केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Lok Sabha Election : महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका, तिकिटं का कापली?
ADVERTISEMENT