Narendra Modi : '...तर बाळासाहेबांना फार दु:ख झाले असते', PM मोदींनी ठाकरेंच्या वर्मावर ठेवलं बोट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

narendra modi criticize udhhav thackeray and congress kolhapur rally lok sabha election shahu maharaj
ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना असल्याचा उल्लेख करत मोदींनी ठाकरेंवर टीका केली.
social share
google news

PM Narendra Modi Criticize Uddhav Thackeray : काँग्रेसने राम मंदिराच निमंत्रण स्विकारलं नाही, त्यांनी राम मंदिराला नेहमीच विरोध केला. आज शिवसेना त्यांच्यासोबत जाऊन स्वत:चे अस्तित्व गमावून बसली आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप दु:ख झाले असते. तसेच उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे, असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. (narendra modi criticize udhhav thackeray and congress kolhapur rally lok sabha election shahu maharaj) 

ADVERTISEMENT

कोल्हापूरच्या सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. 
काँग्रेसचे सर्व पाप माफ केले आणि ट्रस्टने प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिले. तरी देखील त्यांनी राम मंदिराच निमंत्रण स्विकारलं नाही. सनातन धर्माला ड़िएमके पार्टी विरोध करते आणि जी लोक सनातनच्या विनाशाची भाषा करतात त्यांना इंडी आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलावून सन्मान करतात. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना हे दृष्य पाहून किती दु:ख झाले असते, त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असत्या, असे विधान करून पंतप्रधान मोदींनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. 

हे ही वाचा : पूनम महाजनांचं तिकीट कापलं.. उज्ज्वल निकमांना उमेदवारी!

तसेच इंडिया आघाडी वोट बँकेच्या राजकारणावर इतकी खालच्या थराला गेली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर हे औरंगजेबांना मानणाऱ्यांशी हातमिळवणी करतात. आज बाळासाहेब असते तर यांच्या (ठाकरेंच्या)  भूमिकेचे त्यांना फार दु:ख झाले असते. आज त्यांची जिकडेही आत्मा असेल, त्यांना ठाकरेंच्या या कारनाम्याने दु:ख झाले असते. तसेच ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना असल्याचा उल्लेख करत मोदींनी ठाकरेंवर टीका केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर

देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील 27 टक्के आरक्षण रातोरात कागदपत्रावर शिक्का मारून मुस्लिमांना देऊन टाकले. त्यामुळे एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी कोट्यातील 27 टक्के आरक्षण लागू झाले. त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण पुर्णपणे लुटले, असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT