Narendra Modi: 'Modi Ka Parivar' सोशल मीडियावरून हटवा, मोदींनी का सांगितलं असं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

'Modi Ka Parivar', सोशल मीडियावरून हटवा, मोदींचा आदेश
'Modi Ka Parivar', सोशल मीडियावरून हटवा, मोदींचा आदेश
social share
google news

Modi Ka Parivar: नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन चालवलं होतं. या अंतर्गत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावापुढे 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली होती. पण आता पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हा नामोल्लेख हटवावा. (now you can remove modi Ka parivar from social media why did pm modi make this appeal told the reason bjp lok sabha election)

'Modi Ka Parivar हटवा...' 

याविषयी पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे. पाहा या ट्विटमध्ये मोदींनी नेमकं काय म्हटलंय.

'निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून, भारतभरातील लोकांनी माझ्याबद्दल आपुलकीचे प्रतीक म्हणून त्यांच्या सोशल मीडियावर 'मोदी का परिवार' असा लिहलं होतं. त्यातून मला खूप बळ मिळालं. भारतीय जनतेने NDA ला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे, एक प्रकारचा विक्रम आहे आणि आम्हाला आमच्या देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश दिला आहे.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'आपण सर्व एक कुटुंब आहोत, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवल्यामुळे मी पुन्हा एकदा भारतातील लोकांचे आभार मानू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की तुम्ही आता तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 'मोदी का परिवार' हे हटवावं आणि तुमचं नाव बदलू शकता पण भारताच्या प्रगतीसाठी झटणारे कुटुंब म्हणून आपले नाते मजबूत आणि अतूट आहे.'

हे ही वाचा>> ठाकरेंचं चंद्रकांत पाटलांकडून कौतुक, भाजप-शिवसेनेत दिलजमाई होणार?

Modi Ka Parivar निवडणूक कॅम्पेन

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं मोदी का परिवार हूं' हे निवडणूक कॅम्पेन सुरू केलं होतं. यासोबतच 'मैं मोदी का परिवार हूं' हे थीम साँगही लाँच करण्यात आलं होतं. आपल्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदींनी 'माझा भारत, माझे कुटुंब' असे लिहिले होते. यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे बायो बदलले होते.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT