Ram Mohan Naidu : 23 कोटींची संपत्ती, शेअर्समध्ये करोडोंची गुंतवणूक; मोदींच्या कॅबिनेटमधील यंग मंत्री कोण?
Ram mohan Naidu Net Worth : राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात. राम मोहन नायडू हे 36 वर्षांचे असून त्यांचे वडील टीडीपी नेते येरान नायडू हे माजी केंद्रीय मंत्रीही आहेत.
ADVERTISEMENT
PM Modi new cabinet minister list 2024 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.यानंतर इतर कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. या शपथविधीत एक नाव खूपच खास होते. या नावाचा मोदींच्या मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता. हे नाव म्हणजे सर्वांत तरूण मंत्री राममोहन नायडू आहे. नायडू हे फक्त यंग मंत्रीच नाही आहेत, तर त्यांच्या नावावर करोडोची संपत्ती आहे. (pm narendra modi cabinet minister list 2024 youngest minister tdp rammohan naide networth house share market investment and other details)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत पुढे आलेल्या तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) नेते राम मोहन नायडू किंजरापू मोदी सरकार 3.0 मधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनणार आहेत. राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात. राम मोहन नायडू हे 36 वर्षांचे असून त्यांचे वडील टीडीपी नेते येरान नायडू हे माजी केंद्रीय मंत्रीही आहेत.
संपत्ती किती?
मायनेता. इन्फोवर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राममोहन नायडू यांची एकूण संपत्ती 23.30 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : PM Modi new cabinet minister list 2024 : असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी
शेअर्समध्ये 'इतक्या' कोटीची गुंतवणूक
राममोहन नायडू यांनीही शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲक्सिस बँक शेअर, चेकॉन शेअर, इन्फाय शेअर, टाटा स्टील शेअर, टीसीएस शेअर, झील शेअर, झायडस लाइफ शेअर, आयटीसी, एनओआयसीएल, सेल या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. शेअर्समधील गुंतवणुकीबद्दल बोलायचं झांल तर राममोहन नायडू यांनी 1.10 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.
करोडोंच्या किमतीचे दागिने
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राममोहन नायडू यांच्याकडे 1.45 लाख रुपयांची रोकड आहे, तर त्यांच्या पत्नीकडे सुमारे 2 लाख रुपयांची रोकड आहे. याशिवाय त्यांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 3 कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. यासोबतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे 48 लाख रुपयांच्या एलआयसी पॉलिसी आहेत. कुटुंबीयांच्या मालकीच्या दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास,त्याची किंमत अंदाजे 1.51 कोटी रुपये आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मोदी-शाहांचा धक्का, 20 मंत्र्यांचा पत्ता कट; नारायण राणे ते स्मृती ईराणी...
स्थावर मालमत्ता किती?
निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार राममोहन नायडू यांच्या नावावर सुमारे 1.26 कोटी रुपयांची शेतजमीन असल्याचे सांगितले आहे. याशिवाय 4,25,33,180 रुपये किमतीचे आलिशान घर आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर हैदराबादमध्ये तीन कोटी रुपयांचा फ्लॅटही आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT