Lok Sabha Election 2024 : Covid लसीच्या सर्टिफिकेटवरून PM मोदींचा फोटो गायब, नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi photo take down website union minister pmo office lok sabha election 2024 bjp
पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचा फोटो हटवण्याता आला आहे.
social share
google news

Pm Narendra Modi, Lok Sabha Election 2024  : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सात टप्प्यात ही निवडणूक पार पडतेय. यामधील दोन टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. तर पाच टप्प्यांची निवडणूक अद्याप पार पडायची बाकी आहे. तत्पुर्वी कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचे फोटो गायब झाले आहेत. नेमकं या मागचं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (pm modi photo take down website pmo office lok sabha election 2024 bjp union minister)

ADVERTISEMENT

कोरोना काळात कोविड लस घेतल्यानंतर कोविन अॅपवरून नागरीकांना सर्टिफिकेट दिले जायचे. या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो झळकायचा. मात्र आता या सर्टिफिकेटवरुन मोदींचे फोटो गायब झाले आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त होतं आहे. पण अचानक मोदींचे फोटो गायब होण्यामागचे कारण काय? तर त्याच झालं असं आहे की, देशात लोकसभा निवडणूक जाहिर झाल्या असल्या कारणाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेंमुळे कोवीड लसीकरणाच्या सर्टिफिकेटवरून मोदींचे फोटो हटवण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : Bharat Gogawale : ''घरच्या बाईमुळे शिवसेना फुटली'',

सरकारी वेबसाईटवरून मोदींचे काढले फोटो 

आचारसंहितेमुळे आता सरकारच्या जितक्याही अधिकृत वेबसाईट आहेत, या वेबसाईटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो काढले गेले आहेत.पंतप्रधान कार्यालयाने देखील पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांचे फोटो काढले आहेत, परंतु काही मंत्रालयांनी अद्याप त्याचे पालन केलेले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे आचारसंहिता लागू असताना सत्तेत असलेल्या पक्षाने मग ते केंद्रात असो किंवा राज्यात असो, त्यांनी प्रचारासाठी आपल्या अधिकृत पदाचा वापर करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी कोणत्याही स्वरूपात आर्थिक अनुदान जाहीर करू शकत नाहीत. आणि सत्तेत असलेल्या पक्षाच्या बाजूने मतदारांवर प्रभाव पाडणारा कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर करता येणार नाही. 

हे ही वाचा : शिवसेनेने तिसऱ्यांदा दिली उमेदवारी, कोण आहेत हेमंत गोडसे?

पंतप्रधान कार्यालयाकडून मोदींचा फोटो हटवण्याता आला आहे.पण कायदा मंत्रालयाच्या वेबसाईटवरून अजूनही कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, त्यांचे कनिष्ठ मंत्री पीपी चौधरी यांची छायाचित्रे आणि पंतप्रधानांच्या 'मन की बात' मासिक रेडिओ पत्त्याची लिंक आहे. तसेच अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वेबसाइटवर मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि त्यांचे कनिष्ठ मंत्री वीरेंद्र कुमार यांचे फोटो दिसत आहेत. 

ADVERTISEMENT

केंद्र आणि राज्य सरकारांना सार्वजनिक मालमत्ता आणि विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, महापालिका इमारती, सरकारी कार्यालये यांसारख्या सार्वजनिक मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणांवरील भिंती, पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर आणि झेंडे यांच्या स्वरूपातील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान देशात 19 एप्रिलपासून लोकसभेच्या निवडणुकीला सुरूवात झाली आहे. सात टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे. त्यानंतर 4 जूनला या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT