Rahul Gandhi : "....तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते"
Rahul Gandhi on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक मोठा दावा केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राहुल गांधींचा मोदींवर हल्ला
वाराणसी लोकसभा मतदारसंघात मोदींना 1 लाख 50 हजारांचेच मताधिक्य
काँग्रेसचे अजय राय होते विरोधी उमेदवार
Rahul Gandhi vs PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केली. काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील नेते अजय राय यांचा पराभव करत मोदी सलग तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले. पण, पंतप्रधान मोदींच्या मताधिक्यांची निकालापासून चर्चा होत आहे. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक मोठं विधान केले आहे. (Congress leader Rahul Gandhi Said that If Priyanka Gandhi had contested from Varanasi Lok Sabha, PM Modi would have lost by 2 to 3 lakh votes)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राहुल गांधींची रायबरेली लोकसभा मतदारसंघात विजयी सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी अमेठी, रायबरेली या मतदारसंघातील विजयाबरोबरच पंतप्रधान मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाबद्दलही भाष्य केले.
मोदींच्या विजयाबद्दल राहुल गांधी काय म्हणाले?
मोदींना लक्ष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, "फक्त अयोध्येत नाही, तर वाराणसीमध्येही मोदी थोडक्यात वाचले आहेत. मी तुम्हाला सांगतो आणि बहिणीला (प्रियांका गांधी) सांगतोय की, जर ही वाराणसीमधून लढली असती, तर आज भारताचे पंतप्रधान 2 ते 3 लाख मतांनी वाराणसीतून निवडणूक हरले असते."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
"मी ही गोष्ट अहंकारातून बोलत नाहीये. मी हे यासाठी सांगतोय कारण भारताच्या पंतप्रधानांना देशातील जनतेने मेसेज दिला आहे की, हे जे तुमचे राजकारण आहे, ते आम्हाला आवडलं नाही. आम्ही याच्या विरोधात आहोत. आम्ही द्वेषाच्या विरोधात आहोत", असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीकेचे बाण डागले.
हेही वाचा >> शरद पवारांच्या 'या' खासदाराचा अजितदादांना फोन?, NCP मध्ये मोठी घडामोड!
"आम्ही हिसेंच्या विरोधात आहोत. आम्हाला प्रेमाने राहणारा देश हवा आहे. आम्हाला प्रगती हवी आहे. आम्ही बेरोजगारीच्या विरोधात आहोत. तुम्ही दहा वर्ष या देशात बेरोजगारी वाढवली. द्वेष पसरवला. हिंसा पसरवली. भारताच्या जनतेने पंतप्रधानांना उत्तर दिले आहे", असे उत्तर राहुल गांधींनी मोदींना दिले.
ADVERTISEMENT
2014 आणि 2019 मध्ये मोदींना किती मिळाले होते मताधिक्य?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याची चर्चा होत आहे. राजकीय विश्लेषकांबरोबरच राहुल गांधींनीही या मुद्द्यावर बोट ठेवलं. त्यामुळे मोदींना 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत किती मताधिक्य मिळाले होते, हे पाहणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी 'एवढ्या' जागा जिंकतील? यादीच पाहा!
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव या उमेदवार होत्या. त्यांचा मोदींनी तब्बल 6 लाख 74 हजार 664 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता. मोदींना तब्बल 63.62 टक्के मते मिळाली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधा मोदींविरोधात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढवली होती. मोदींनी त्यांचा तब्बल 3 लाख 71 हजार 784 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता. मोदींना त्यावेळी 56.4 टक्के मते मिळाली होती.
ADVERTISEMENT