Ram Satpute : ''शिंदेंनी सोलापूरमधील 12 अतिरेक्यांना वाचवलं'', राम सातपुतेंच्या आरोपाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

ram satpute serious allegation on sushilkumar shinde saved 12 terrorist praniti shinde congress candidate
12 अतिरेक्यांना सोडून देण्याचे काम त्यांनी केले
social share
google news

Ram Satpute Serious Allegation on SushilKumar Shinde : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. या लढतीपुर्वी दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात आता राम सातपुते (Ram Satpute) यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खळबळ उडवून टाकणारा आरोप केला आहे. ''मुख्यमंत्री असतांना सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी दहशतवाद प्रतिबंध कायदानुसार कारवाई करण्यात आलेल्या सोलापूरमधील 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केल्याचा'' आरोप सातपुते यांनी केला होता. हंव तर या संबंधित यादी देखील देतो, असे सातपुते यांनी म्हटले आहे.  (ram satpute serious allegation on sushilkumar shinde saved 12 terrorist praniti shinde congress candidate) 

ADVERTISEMENT

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा येथे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार सातपुते बोलत होते. यावेळी बोलताना राम सातपुते यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. ''समाज विघातक कृत्ये करणाऱ्यांसाठी 2002 मध्ये सरकारने दहशतवाद प्रतिबंध कायदा केला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना दहशतवाद प्रतिबंध कायदानुसार अडकलेल्या सोलापूरच्या 12 अतिरेक्यांना वाचवायचे काम केल्याचा'' गंभीर आरोप भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला आहे. या 12 अतिरेक्यांना सोडून देण्याचे काम त्यांनी केले असून, हवी तर त्याची यादीही देतो, असे सातपुते यांनी म्हटले होते. 

हे ही वाचा : "वंचितला सांगावं लागेल की...", पटोलेंचा स्फोटक खुलासा, आंबेडकरांना सवाल

महिन्यातून दोन दिवस मतदारसंघात यायचे आणि एकदाच फोटो काढायचा. तोच फोटो तिकडे 15 दिवस दाखवत भेटी दिल्याचे दाखवण्याचं काम ताईने केले आहे. असले धंदे मी करत नाही असं म्हणत सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना टोला लगावला. तसेच आजवर 75 वर्षात कोणी हिंदूंना आतंकवादी म्हणायचे धाडस केले नव्हते, ते या सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते सोलापूरचे कलंक असल्याचा घणाघाती टीका आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान आता सातपुते यांनी केलेल्या या आरोपावर आता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : India Rally : "400 काय 180 चा टप्पाही...", राहुल गांधींचं भाजपबद्दल मोठं भाकित

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT