Lok Sabha : महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका, MVA ला किती जागा येणार?
Satta Bazar Prediction : सट्टा बाजाराने (Satta Bazar) भाजपच्या एनडीए आघाडीला (महायुतीला) महाराष्ट्रात 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा महायुतीसाठी मोठा झटका मानला जात आहे.
ADVERTISEMENT
Satta Bazar Prediction on Maharashtra Lok Sabha : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठीचे मतदान 20 मे लाच संपुष्ठात आले आहे. त्यानंतर आता 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी महाराष्ट्रातील महायुतीला (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) नेमक्या किती जागा मिळणार? याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. आता सट्टा बाजाराने (Satta Bazar) भाजपच्या एनडीए आघाडीला (महायुतीला) महाराष्ट्रात 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा महायुतीसाठी मोठा झटका मानला जात आहे. (satta bazar prediction on maharashtra lok sabha 2024 maha vikas aghadi mahayuti india alliance nda lok sabha 2024)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आजतक आणि इंडिया टूडेने सट्टाबाजारातील मुंबईतील टॉप बुकींशी बातचित केली. यामध्ये सट्टेबाजीच्या बाजाराच्या ताज्या अंदाजानुसार भाजपच्या एनडीए आघाडीला म्हणजेच महायुतीला महाराष्ट्रात 28 जागा मिळू शकतात.
हे ही वाचा : Lok Sabha : शिंदे 'ही' जागा गमावणार, तर ठाकरेंच्या पारड्यात विजय
दरम्यान राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून गेल्या निवडणुकीत एनडीएने 42 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळेस एनडीएला 28 जागा मिळाल्या तर त्यांना 14 जागांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचवेळी एनडीएच्या जागा कमी झाल्याने याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फक्त 6 जागा आल्या होत्या. यावेळेस ते 20 जागांच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, सट्टा बाजाराचा अंदाज काय?
1) नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे जिंकतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.
2) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल, असे भाकित सट्टा बाजाराने केले आहे. येथून प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत आहेत.
ADVERTISEMENT
3) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेंना फटका बसणार, असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. येथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख हे निवडणूक लढवत आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार ही जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल.
ADVERTISEMENT
4) गेल्यावेली अपक्ष खासदार झालेल्या नवनीत राणा यावेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. पण, त्यांना यावेळी झटका बसेल, असा अंदाज आहे. अमरावतीची जागा काँग्रेस जिंकेल, असे सट्टा बाजाराचे भाकित आहे. येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे निवडणूक लढवत आहेत.
हे ही वाचा : Exit Poll 2024 : महाराष्ट्रातील एक्झिट पोल कुठे आणि कधी पाहता येणार?
5) महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील, असे सट्टा बाजाराचा अंदाज आहे.
6) भाजपने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. ते विजयी होतील, असा अंदाज आहे.
7) शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव होईल. तर शाहू छत्रपती हे विजयी होतील, असा अंदाज सट्टा बाजाराने मांडला आहे.
ADVERTISEMENT