Priyanka Gandhi: "महिलांनो सतर्क व्हा,1500 रुपयात...", लाडकी बहीण योजनेवरून प्रियांका गांधींनी केलं मोठं आवाहन
Priyanka Gandhi On Ladki Bahin Yojana: देशाची जनता महागाईने त्रस्त झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सुरु केले. पण तुमच्याकडून किती रुपये वसूल केले जात आहेत? असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
प्रियांका गांधींंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा
लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारला धरलं धारेवर
शिर्डीच्या सभेत प्रियांका गांधी काय म्हणाल्या?
Priyanka Gandhi On Ladki Bahin Yojana: "देशाची जनता महागाईने त्रस्त झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सुरु केले. पण तुमच्याकडून किती रुपये वसूल केले जात आहेत? घरातील आवश्यक वस्तू 1500 रुपयांत येतील का? पैसे दिल्याने निवडणुकीत सर्व महिला आम्हाला मतदान करतील, असंही ते म्हणतात. पण महिलांनी सतर्क राहायला पाहिजे. तुमच्यासोबत काय होतंय? हे समजून घ्या. केंद्रात 10 वर्षापासून सरकार आहे. आता तुम्हाला पैसे का देत आहेत? तुम्ही याआधी ही योजना सुरु का केली नाही? जेव्हा सण उत्सव येतो, तेव्हा तुमची मदत करायला कोण येतं? तुमचे डोळे कोण पुसतं?" असा थेट सवाल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारला केला आहे. त्या शिर्डीत काँग्रेसच्या सभेत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
"मोदी मुंबईच्या सभेत म्हणाले, तेव्हा सरकार वेगळं होतं. आता मोदी आहे. आता दहशतवाद नाही. पण मला त्यांना सांगायचं आहे की मोदीजी तुम्ही महाराष्ट्रातील लोकांची भेट घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल माझ्या बहिणी किती दहशतवादाचा सामना करत आहेत. सरकारने महागाईची दहशत तुमच्या सर्वांसमोर सोडली आहे. त्याचा सामना माझ्या बहिणी कशा करत आहेत, हे तुम्हाला कळेल. ही पहिली दिवाळी असेल, जी तुम्ही साजरी करू शकला नाहीत. जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तेव्हा अर्ध्या गोष्टी सोडून येता. घरात एखादं संकट आलं की पैसे कुठून येणार? पैसे नसल्याने मनात भीती निर्माण होते, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
हे ही वाचा >> Nana Patole: निवडणूक जिंकल्यानंतर MVA चा मुख्यमंत्री कोण होईल? नाना पटोलेंनी थेट सांगितलं
सरकारने रोजगाराचे सर्व माध्यम संपवले आणि मंचावर येऊन सांगतात ते सरकार वेगळं होतं. आज मोदी आहे. आज मोदी आहेत, म्हणून एव्हढी महागाई आहे. म्हणून येथील शेतकरी तडपत आहे. यामुळेच दहा वर्षांपासून सोयाबीनचे भाव वाढवले नाहीत. कारण मोदीजी आहेत. स्वत:च सांगतात, आज मोदी आहेत. म्हणून येथील शेतकरी तडपत आहे. यामुळेच दहा वर्षांपासून सोयाबीनचे भाव वाढवले नाहीत. कारण मोदीजी आहेत. स्वत:च सांगतात, आज मोदी आहेत. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? जे काही खरेदी करतात त्यावर जीएसटी लावलात. शेतकरी आज संकटात आहे. तुम्ही दहा वर्षांपासून प्रधानमंत्री आहेत. तुम्ही काहीच केलं नाही, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Nitesh Rane: "सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या...", आमदार नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान
ADVERTISEMENT