Satara Lok Sabha Election : शरद पवारांच्या उमेदवारांवरच अटकेची तलवार, प्रकरण काय?
Satara Lok Sabha Shashikant Shinde : सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध नवी मुंबईत गुन्हा दाखल
उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध लढवताहेत निवडणूक
Satara Lok Sabha election, Shashikant Shinde : सातारा लोकसभेची यावेळची निवडणूक अटीतटीची आणि संघर्षपूर्ण होणार असं दिसत आहे. कारण ज्यांना शरद पवारांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात मैदानात उतरवलं, त्यांनाच अटक होण्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्याविरोधात वाशी येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात एफएसआय घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हाच मुद्दा विरोधकांकडून प्रचारात उचलून धरला जात असून, स्वतः शशिकांत शिंदे आणि शरद पवार या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईतील एपीएमसी फळ बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांच्यासह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. 10 कोटींच्या कथित शौचालय घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात शशिकांत शिंदे यांचेही नाव असून, ते जामिनावर बाहेर आहेत.
त्यापाठोपाठ एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालिन सचिव सुधीर तृंगार आणि इतर २२ संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे वाचलं का?
शशिकांत शिंदेंना अटक होण्याची शरद पवारांनीही भीती?
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले विरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे.
हेही वाचा >> भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं
पानसरे यांना अटक झाली तेव्हा पवार म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली. मुंबईच्या कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना कुठे काहीतरी आरोप झाले, तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव, त्यांना आज अटक करून टाकले."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शरद पवारांना भाजपचा सोलापुरात धक्का; पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट
"त्या मार्केटमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज साताऱ्यामधून लोकसभेचे उमेदवार आहेत, ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नोटिसा दिल्या. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटिसा देतात, त्यांना अटक करण्याची दमदाटी देतात. त्याचा अर्थ स्वच्छ आहे, सत्तेचा गैरवापर करणे हा एक कलमी काम देशाचे प्रधानमंत्री आज करत आहेत."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "तुम्ही कितीही थापा मारल्या तरी...", भाजपचा ठाकरेंवर पलटवार
शशिकांत शिंदे यांच्यावर जेव्हा दुसरा गुन्हा दाखल झाला तेव्हा पवारांनी थेट संघर्षाचाच इशारा दिला. "शशिकांत शिंदे यांना अटक केली, तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करणार. शिंदेंना निवडणुकीत थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत", असेही ते म्हणाले.
दुसरीकडे हे गुन्हे दाखल झाल्याने शशिकांत शिंदेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. आणखी तिसरा गुन्हा कधी दाखल होतोय, याचीच वाट पाहत आहे. ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्यामुळे हे प्रयत्न सुरू आहेत", असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न
भाजपकडून लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. शशिकांत शिंदेंनाही याच मुद्द्यावरून घेरण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा या मतदारसंघात सुरू आहे. शिंदेंनी माथाडी कामगारांसाठी कामातही पैसा खाल्ला अशी मांडणी भाजपकडून सध्या केली जात आहे.
दुसरीकडे शशिकांत शिंदे यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी मतदारसंघात कारवाईचे उलट प्रतिसाद उमटण्याचीही भीती आहे. त्यामुळे असे काही होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चाही सुरू आहे.
एफएसआय घोटाळा प्रकरण काय?
नवी मुंबई वाशीतील एपीएमसी मसाला बाजारमधील 466 गाळेधारकांना 2009 मध्ये वाढीव एफएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे 62 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या गाळेधारकांना वाढीव एसएफआयसाठी प्रतिचौरस फुटासाठी ६०० रुपये दर हा तत्कालिन संचालक मंडळाने आकारला होता, असा आरोप आहे.
रेडीरेकनरचे त्यावेळचे दर हे ३ हजार ६६ रुपये प्रति चौरसफूट असताना फक्त प्रतिचौरस फूट ६०० रुपये आकारल्याने शासनाचे 62 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT