Sangli Lok Sabha: 'जनावरही सांगेल हा काँग्रेसचा जिल्हा', विश्वजीत कदमांनी राऊतांना डिवचलं!
Sangli Constituency Shiv Sena ubt vs Congress: सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद कायम आहे. त्यातच आमदार विश्वजीत कदम यांनी संजय राऊत यांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
Vishwajit Kadam vs Sanjay Raut: सांगली: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र असं असतानाही जागा वाटपावरुन बरीच रस्सीखेच सुरू आहेत. त्यातही सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात आता तू-तू मैं-मै देखील सुरू झाली आहे. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सांगलीची जागा त्यांचीच असल्याचं ठासून सांगत असताना दुसरीकडे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी आता थेट संजय राऊतांनाच डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
विश्वजीत कदम हे भाजपच्या वाटेवर आहेत का? असा सवाल सांगलीतील पत्रकार परिषदेत संजय राऊतांना विचारण्यात आला तेव्हा राऊतांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'विशाल पाटील यांचं एक भाषण मी ऐकलं.. त्यांचे पायलट आहे कोणी तरी एक.. ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल असं ते म्हणाले.. अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात. गुजरातलाच उतरू शकतं विमान..' असं म्हणत राऊतांनी विश्वजीत कदमांवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.
पाहा सांगलीत संजय राऊत नेमकं काय म्हणाले..
'सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा आहे. तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीत एकास-एक लढत व्हावी अशी सर्व ज्येष्ठ नेत्यांची ही मागणी. सांगलीतील खदखद किती आहे हे मी पाहतोय मागील दोन दिवसांच्या दौऱ्यात. शिवसेनेच्या उमेदवाराला जो पाठिंबा मिळतोय त्यात कोणी मोडता घालायचा प्रयत्न करतोय का.. ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असेल तर ते होऊ नये. यासाठी आम्ही सावध आहोत. लढत एकास एक व्हावी आणि सांगलीत चमत्कार काय होतो ते पाहा.'
हे वाचलं का?
हे ही वाचा>> शिंदेंचं टेन्शन वाढणार, गणपत गायकवाडांच्या ऑफिसमध्ये काय घडलं?
'विशाल पाटील यांचं एक भाषण मी ऐकलं.. त्यांचे पायलट आहे कोणी तरी एक.. ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईल असं ते म्हणाले.. आता ते विमान कुठे उतरतेय ते पाहावं लागेल. ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये. एवढीच आम्हाला चिंता आहे.'
'अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात. गुजरातलाच उतरू शकतं विमान.. ठीक आहे.. आम्ही पायलटशी चर्चा करू.. पायलटला नीट ट्रेनिंग देऊ.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्याबाबत जेव्हा विश्वजीत कदमांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनीही खास आपल्या शैलीत राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> बारामतीत फडणवीसांची मोठी खेळी, पवारांविरूद्ध 'ही' रणनिती आखणार
जनावर देखील सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा जिल्हा
'संजय राऊत काय बोलतात त्यावर मला वाटतं की, प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाहीए. सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल.. राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात तो अनेकांना माहीत आहे देशाच्या स्वातंत्र्यापासून.. कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर तो जनावर देखील सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा जिल्हा आहे. मी जनावरं का म्हणतो कारण की, शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात. म्हणून संजय राऊत कोणत्या अर्थाने काय म्हणतात मला त्यावर टीका-टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही.' असं म्हणत विश्वजीत कदमांनी राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT