Vijay Shivtare : 'महाविकास आघाडीच पलटूरामांचा मेळावा...,' व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांचे सडेतोड उत्तर
Vijay shivtare shiv sena worker reply viral Letter : बापूंनी अजित पवारांशी तह केल्याचं दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजलं.
ADVERTISEMENT
Vijay shivtare shiv sena worker reply viral Letter : बारामती लोकसभा मतदार संघात बंडाचा झेंडा फडकावलेल्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे अजित पवारांसोबत मनोमिलन झाले आहे. या मनोमिलनानंतर शिवसैनिकांनी पत्र लिहून माझा नेता पलटूराम अशी टीका विजय शिवतारे यांच्यावर केली होती.या टीकेला आता पत्राच्याच माध्यमातून शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (vijay shivtare shiv sena work reply viral shiv sainik letter baramati lok sabha election 2024 ajit pawar)
ADVERTISEMENT
शिवतारेंच्या कार्यकर्त्यांचे पत्र जसंच्या तसं...
(बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाचे उत्तर)
प्रिय बोगस शिवसैनिक मित्रा
सप्रेम जय महाराष्ट्र !
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं. निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही.
हे ही वाचा : Ajit Pawar : 'ही जागा राष्ट्रवादीची होती, पण...',
बापूंनी अजित पवारांशी तह केल्याचं दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजलं. ह्याच पुरंदरला महाराजांनी तह करून २३ किल्ले गनिमाला देऊ केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही कालावधीत आपल्या मुळ किल्ल्यांसह मराठी साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून दिलं होतं. हल्ला, प्रतिहल्ला, त्याग, समर्पण, तह आणि त्यातून जनकल्याण साधणं हे पुरंदरला नवीन नाही. ज्या माणसाने पुरंदरच्या पाण्यासाठी स्वतःचं अपरिमित शारीरिक नुकसान करून घेतलं त्याला गुंजवणीच्या पाण्यापेक्षा मोठं काहीच नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न या तहातून सुटणार असतील तर असा तह करणं कधीही योग्यच.
बारामतीत बसून अशी पत्र लिहिण्यापेक्षा बारामतीच्या सुपे परगण्यात, पुरंदरच्या पूर्व भागात आणि इतर दुष्काळी परिसरात फिरलास तर गुंजवणीचं महत्त्व तुला कळेल. राहिला प्रश्न विश्वासार्हतेचा. महाविकास आघाडी हाच मुळात पलटूराम लोकांचा मेळावा आहे. ज्यांची आयुष्ये स्वार्थासाठी पलट्या आणि कोलांटउड्या मारण्यात गेली त्यांनी विजय शिवतारे यांना विश्वासार्हता शिकवावी हाच मोठा विनोद आहे. खोके वगैरेची आवश्यकता शिवतारे यांना मुळीच नाही. त्यांच्या पुढच्या पिढीलाही नाही. इथला प्रत्येक नागरीक हे जाणतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'गाव तिथे बिअरबार', अशी अजब आश्वासनं देणाऱ्या चंद्रपुरातील उमेदवार वनिता राऊत कोण?
बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव . शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे.
धन्यवाद.
पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र !
ADVERTISEMENT
तुझा,
(माणिक निंबाळकर)
मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे
ADVERTISEMENT