Mumbai North Central Lok Sabha : भाजपने का दिलं तिकीट? उज्ज्वल निकमांनीच दिलं उत्तर
BJP fields Ujjwal Nikam from Mumbai North Central seat : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेल्या उज्ज्वल निकम यांची खास मुलाखत पहाच...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उज्ज्वल निकम यांना भाजपने दिले तिकीट
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
उज्ज्वल निकम यांची महत्त्वाची मुलाखत
Ujjwal Nikam, Mumbai North Central Lok Sabha 2024 : एका मतदारसंघात हिंदी भाषिक, तर दुसऱ्या मतदारसंघातून गुजराती व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून मराठी चेहरा मैदानात उतरवणार, अशी जोरात चर्चा होती. त्यावर शनिवारी (२७ एप्रिल) शिक्कामोर्तब झाले. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली.
ADVERTISEMENT
विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी न देता उज्ज्वल निकम यांना तिकीट का दिलं गेलं, याची आता चर्चा जोरात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 'मुंबई Tak'ने निकम यांच्याशी संवाद साधला. यात त्यांनी तिकीट मिळण्याचे कारणे आणि ही निवडणूक किती आव्हानात्मक आहे, याबद्दल मनमोकळी उत्तर दिली...
पहा उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांच्याशी लढत
२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपच्या पूनम महाजन विजयी झाल्या होत्या. तर त्यापूर्वी म्हणजे २००९ मध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड जिंकले होते. आता त्यांची लेक वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. वर्षा गायकवाड २००९ ची पुनरावृत्ती करतात की, उज्ज्वल निकम हे गुलाल उधळतात, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT