अभिनेत्री नृत्यांगना आदिती द्रविड नव्या भूमिकेत; भरतनाट्यमचं ऑनलाईन करणार मार्गदर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री आदिती द्रविडने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली. तर आता अॅक्टिंग व्यतिरिक्त आदिती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री अदिती द्रविड आता भरतनाट्यमचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कलावंतांना नृत्याचे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे.

ADVERTISEMENT

अदितीने पुण्यातील भारती विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. तिने भरतनाटयममध्ये एमए केलं आहे. तसंच गंधर्व महाविद्यालयाच्या विशारद पर्यंतच्या परीक्षांमद्धे ती अव्वल गुणांसह प्रथम श्रेणीमद्धे उत्तीर्ण झाली. इयत्ता पाचवीत असल्यापासून अदितीने गुरू स्वाती दैठणकर यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे.

या नव्या भूमिकेबाबत अदिती सांगते की “खरंतर भरतनाट्यम नृत्यमुळेच माझी अभिनयाची ओळख झाली, खूप आधीपासून भरतनाट्यम हा कलाप्रकार शात्रशुद्ध पद्धतीने कलावंतापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती. पण चित्रीकरणासाठी होणाऱ्या पुणे-मुंबई प्रवासामुळे ते शक्य होत नव्हतं. लॉकडाऊन मुलं सध्या घरी आहेत. त्यामुळे भरतनाट्यम ऑनलाईन माध्यमातून कलावंतांपर्यंत पोहोंचवण्याचा एक प्रयत्न आहे. आणि त्याला सोशल मीडियावर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे”.

हे वाचलं का?

शनायाची मैत्रीण म्हणून आधिती प्रेक्षकांना परिचित आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने आदितीला एक ओळख मिळवून दिली. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे २०१७ साली संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT