Salman Khan : ''सलमानने काळवीट मारलेले नसले तरी बिश्नोई समाजाची माफी मागावी'', प्रसिद्ध गायक असं का म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

salman khan should go to bishnoi tempel and  apologize blackbuck case anup jalota baba siddique case
''सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी'',
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी

point

बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी

point

प्रसिद्ध गायकाची सलमानला विनंती

Anup Jalota On Salman Khan : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला एकामागुन एक जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येत असल्याची माहिती आहे. या दरम्यान सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, अशा मागणीला जोर धरतोय. अशात आता ''सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, असी विनंती एका प्रसिद्ध गायकाने केली आहे. (salman khan should go to bishnoi tempel and  apologize blackbuck case anup jalota baba siddique case)

ADVERTISEMENT

सलमान खानने जरी काळवीट मारलेले नसले. मात्र त्याने बिष्णोई मंदिरात जाऊन माफी मागावी. आपल्या कुटुंबाच्या आणि जवळच्या लोकांच्या सुरक्षेसाठी त्याने हे पाऊल उचलले पाहिजे, असे प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांनी सलमान खानला म्हटले आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत जलोटा यांनी ही विनंती केली आहे. 

हे ही वाचा : Salman Khan Threat Message : 'सलमान'ला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांना आलेल्या मेसेजमध्ये काय म्हटलंय?

माझी सलमानला एक छोटीशी विनंती आहे की त्याने मंदिरात जाऊन स्वतःच्या, त्याच्या कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या कल्याणासाठी माफी मागावी. मला खात्री आहे की ते त्यांची माफी स्वीकारतील. सलमानने जाऊन पुन्हा सुरक्षित जीवन जगावे. प्रकरणे गुंतागुंतीची करण्याची ही वेळ नाही. त्याने मारले असो वा नाही, सलमानने माफी मागावी. भांडणात अडकून कोणाला काही मिळणार नाही, असा सल्ला देखील जलोटा यांनी दिला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनुप जलोटा पुढे म्हणाले, मला एवढेच सांगायचे आहे की कोणी मारले आणि कोणी केले नाही यात अडकण्याची वेळ नाही. सलमानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी याची हत्या झाल्याचे समजले पाहिजे. आता हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला पाहिजे, असे देखील जलोटा यांनी सांगितले. 

हे ही वाचा : धमकी, रेकी, फायरिंग आणि मित्राची हत्या...लॉरेन बिश्नोईने सलमान खानला कसं केलं भयभीत? वाचा Inside Story

सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातला वाद हा 1998 पासून सूरू आहे. जेव्हा सलमानवर काळवीट मारल्याप्रकरणी केस दाखल झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये जोधपूर कोर्टात सलमान खानाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून सलमानला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान काळवीट शिकारीची ही घटना राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. जेव्हा लॉरेन्स बिश्नोई उर्फ बलकरण ब्रार पाच वर्षांचा होता. या घटनेमुळे काळवीटाची पूजा आणि आदर करणाऱ्या बिष्णोई समाजात संताप व्यक्त केला होता. या प्रकरणात सलमान मुख्य आरोपी होता आणि त्याला 2018 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयानेही त्याची निर्दोष मुक्तता केली होती. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT