Ladki Bahin Yojana: खुशखबर! निकालाआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त...
Piyush Goyal On Ladki Bahin Yojana: खुशखबर! निकालआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त... महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजपच्या मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केली मोठी घोषणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नेमका काय बदल होणार?
लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधी मिळणार?
Piyush Goyal On Ladki Bahin Yojana: खुशखबर! निकालआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती. "महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल", असं गोयल म्हणाले होते.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार, राज्य सरकारकडून आतापर्यंत 2.34 कोटी लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यांचा 1500 रुपयांचा हफ्ता मिळाला आहे, असंही गोयल म्हणाले.
हे ही वाचा >> Rahul Gandhi : गौतम अदानी यांना अटक करा... 'या' प्रकरणावरुन राहुल गांधींचे गंभीर आरोप
पियुष गोयल पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.25 लाख रुपये मिळतील. विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 हजार रुपये देण्याचं आणि राज्य परिवहनच्या एसटीत मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं आश्वासनं दिलंय. आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे. महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल, असा मला विश्वास आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Today Gold Rate: मतदान संपताच सोन्याचे दर कडाडले; आजचा 1 तोळ्याचा भाव वाचून डोकंच धराल
गुरुवारी सीएनबीसी टीव्ही 18 ग्लोबल लीडरशीप समिट 2024 मध्ये गोयल यांनी म्हटलं की, शरद पवारांच्या गटात हवा बदलताना दिसत आहे. भारताला 2047 पर्यंत विकसीत भारत बनवण्यासाठी महायुतीचं सरकार पुन्हा येईल, असा मला विश्वास आहे. जनगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के महिला खासदार असतील. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत गोयल म्हणाले, आम्ही निवडणूक संपल्यावर निर्णय घेऊ.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT