Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी Bigg Boss च्या घरात सदावर्ते ढाराढूर झोपले, कोंबडा आरवला तरी...Video व्हायरल!

मुंबई तक

Gunaratna Sadavarte, Bigg Boss Season 18 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावर सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. त्यानंतर आता हिंदी बिग बॉस सूरू झाला आहे. या बिग बॉसच्या घरात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॅशिंग एन्ट्री मारली आहे. या डँशिंग एन्ट्रीची चर्चा असतानाचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात डाराडूर झोपलेले पाहायला मिळाले आहेत.

ADVERTISEMENT

 Bigg Bossच्या घरात डाराडूर झोपले सदावर्ते
bigg boss 18 gunaratna sadavarte slept first day bigg boss house video goes viral salaman khan host show
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Bigg Boss च्या घरात ढाराढूर झोपले सदावर्ते

point

इतर सदस्यांनी हाक मारूनही जाग आली नाही

point

झोपेचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Gunaratna Sadavarte, Bigg Boss Season 18 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वावर सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. त्यानंतर आता हिंदी बिग बॉस सूरू झाला आहे. या बिग बॉसच्या घरात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डॅशिंग एन्ट्री मारली आहे. या डँशिंग एन्ट्रीची चर्चा असतानाचा आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओत गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात ढाराढूर झोपलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सदावर्ते झोपल्यामुळे इतर सदस्यांना याचा मनस्ताप सोसावा लागत आहे.  (bigg boss 18 gunaratna sadavarte slept first day bigg boss house video goes viral salaman khan host show) 

बिग बॉसच्या घरातला एक व्हिडिओ एक्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या काऊचवर झोपलेले पाहायला मिळत आहेत. खरं तर बिग बॉसच्या घरात लाईट ऑफ झाल्यानंतर झोपायला परमीशन असते, मात्र सदावर्ते हे काऊचवर दिवसा ढवळ्या झोपलेले पाहायला मिळालेले होते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कोंबडा आरवायला सूरूवात झाली होती. 

हे ही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?

कोंबडा आरवताना पाहून काही सदस्यांनी सदावर्ते यांना उठवण्याचा प्रयत्न केला होता. दोन सदस्य सदावर्ते यांच्या जवळ जाऊन त्यांना जोरजोरात हाक मारत होते.मात्र सदावर्ते काय उठले नाही. त्यानंतर एका सदस्यांने त्यांना हात लावल्यावर त्यांना जाग आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात झोपल्यामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. पण सदावर्तेच्या झोपण्यामुळे इतर सदस्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण कोणताही सदस्य दिवसा झोपल्यास बिग बॉस त्याला शिक्षा सूनावते. त्यामुळे घरच्यांना काय शिक्षा मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान आणखी एका व्हिडिओत गुणरत्न सदावर्तेंच्या प्रकृतीबाबत इतर सदस्य विचारत आहेत. त्यानुसार बिग बॉसच्या घरात त्यांची तब्येत खालावल्याचे समजते आहे. त्यांना बिग बॉसच्या घरात थंडी वाजते आहे. त्यामुळे एक सदस्य त्यांना ब्लँकेट आणून देत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : Janhavi Killekar : सगळ्यांनाच 'बुक्कीत टेंगुळ' देऊन जान्हवीने जिंकले 900000 रूपये!

 

हे वाचलं का?

    follow whatsapp