Shruti Marathe : ‘तुमच्याबरोबर झोपले तर…’, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयंकर किस्सा
Shruti Marathe: एका सिनेमासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे? अशी विचारणा केली. यावेळेस मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली. पण…
ADVERTISEMENT
Shruti Marathe Casting Couch Experince: चित्रपटात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावाच लागलो. याबाबत या अभिनेत्रींनी अनेक मुलाखतीत त्यांना आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत.आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे कास्टिंग काऊचचा शिकार ठरली आहे. श्रुती मराठे तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. हा धक्कादायक किस्सा एकूण अंगावर काटा येईल. (shruti marathe casting couch experince radha hi bawari fame actress bollywood news)
ADVERTISEMENT
श्रुती मराठेने नुकतीच आरपार युट्युब चँनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत श्रुतीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचाच अनूभव सांगितला आहे. विशेष म्हणजे तिला आलेला हा कास्टिंग काऊचचा अनुभव हा मराठी इंडस्ट्रीतला आहे. मला इंडस्ट्रीत येऊन बरीच वर्ष झाली होती. त्यावेळेस मी काही इंडस्ट्रीत नवखी नव्हते, असे श्रुती सांगते. एका सिनेमासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे? अशी विचारणा केली. यावेळेस मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास, तर तुला जे मानधन अपेक्षित आहे, ते नक्की देईन, असे फायनान्सर म्हणाला.
हे ही वाचा : Milind Deora : “मिलिंद देवरांच्या राजीनाम्याची वेळ मोदींनी ठरवली होती”
आम्ही दोघेंच त्यावेळेस चर्चा करत होतो.आमच्यासोबत इतर कुणी नव्हतं. त्यामुळे फायनान्सर जे बोलला त्याने मी काही मिनिटांसाठी ब्लँक झाले. पुढे काय बोलाव मला सुचेनाच. मला घामही फुटला. कारण यापूर्वी माझ्यासोबत असे कधीच घडलं नव्हतं. त्यानंतर मी त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देण्याचे ठरवलं.
हे वाचलं का?
मी त्याला म्हटलं, अच्छा मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? तेव्हा तो माणूस समोरून विचारतो, ‘हे काय बोलतेस तू? नंतर मी त्यांना म्हणाले, माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? यापुढे कोणाशीही बोलताना थोडा तरी अभ्यास करून या, असा धक्कादायक अनुभव श्रृतीने या मुलाखतीत सांगितला.
हे ही वाचा : Crime : डेटिंग अॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT