Devendra Fadnavis : ...म्हणून शिंदे दिल्लीला आले नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
दिल्लीत असलेले अजित पवार आज सकाळीच शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे नेते सुद्धा उपस्थित होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस शिंदेंबद्दल काय म्हणाले?
एकनाथ शिंदे दिल्लीला का आले नाहीत?
Devendra Fadnavis Delhi : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिल्लीत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर सर्वांचं लक्ष असताना होणारा या नेत्यांचा दिल्ली दौरा एकनाथ शिंदेंच्या न जाण्यामुळे जास्त चर्चेत आला. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अजित पवार त्यांच्या कामासाठी इथे आले असून, मी माझ्या कामासाठी दिल्लीत आलो आहे. तसंच एकनाथ शिंदे यांचं आज काम नसल्यामुळे ते इथे आले नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले मोदीची आमचे नेते आणि पितृतुल्य आहेत. आमच्या सर्वांचाच स्पेशल कनेक्ट त्यांच्यासोबत आहेत. ते आमच्या पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यांना भेटणं आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असते. मी त्यांना आजच्या भेटीत छत्रपतींची मूर्ती दिली कारण, ते नेहमी छत्रपती शिवरायांच्या मार्गाने ते चालतात.
हे ही वाचा >>Maharashtra Cabinet Expansion Live Updates : शरद पवारांनी तलवारीने कापला वाढदिवसाचा केक
दिल्लीत असलेले अजित पवार आज सकाळीच शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे नेते सुद्धा उपस्थित होते. शरद पवार यांचा आज वाढदिवस असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण भेटल्याचं अजितदादांनी सांगितलं.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांसोबत परभणी, राज्यसभा आणि लोकसभेबद्दल चर्चा झाली. मंत्रिमंडळाचं काय झालं, हिवाळी अधिवेशन वैगेरे गोष्टींवर आमच्यात चर्चा झाली. तसंच चहा-नाष्टा झाला असं अजिदादांनी सांगितलं. आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना सगळेच शुभेच्छा द्यायला येत असतात असंही अजितदादा म्हणाले. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं हे शिकवलं आहे हे सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत. पुढे त्यांनी यावेळी सांगितलं की, 14 डिसेंबरला शपथविधी होऊ शकतो.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Ajit Pawar meets Sharad Pawar Delhi : पवारांची भेट, अर्ध्या तासानंतर बाहेर, अजितदादा, भुजबळ, पटेल काय म्हणाले?
दरम्यान, अजित पवार आणि सुनील तटकरे काही वेळापूर्वीच अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा होते ते पाहणं महत्लाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT