Pushpa 2 Movie Records : फायर नहीं... वाईल्ड फायर! 1000 करोडचा आकडा पार, 'या' मोठ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फायर नहीं... वाईल्ड फायर!

point

अल्लू अर्जूनच्या पुष्पाने मोडले बडे रेकॉर्ड

point

'बाहुबली'लाही टाकलं मागे

 साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'ने नावाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर राज्य केलंय. हा चित्रपट रोज एक नवा रेकॉर्ड तोडताना दिसतोय. चित्रपटाची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असून, 'पुष्पा 2' हा भारतातील सर्वात वेगाने 1000 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

ADVERTISEMENT

रिलीज झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत 'पुष्पा 2' ने प्रत्येक चित्रपटाचा प्रत्येक रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपट एवढा रेकॉर्डब्रेक ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. हा चित्रपट फक्त भारतातच हीट ठरला असं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपटी सुपर-डुपर हीट ठरला आहे. पुष्पाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं असून, चित्रपट पाहण्यासाठी सर्वांची पावलं चित्रपटगृहांकडे वळत आहेत. या चित्रपटाने जगभरातील विक्रम मोडत सर्वच भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion Live Updates : "रघुनाथ मोरे साहेबांच्या जाण्याने शिवसेनेची मोठी हानी...", एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!

दक्षिणेतील मोठं नाव म्हणून ज्यांना ओळखले जाणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा 'बाहुबली 2' चित्रपटालाही पुष्पा-2 ने मागे टाकलं आहे. 'बाहुबली 2' हा एके काळी सर्वात वेगानं 1000 कोटींची कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. अल्लू अर्जुनने एका आठवड्यात मोडलेला हा विक्रम साध्य करण्यासाठी बाहुबलीला 10 दिवस लागले होते.

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >> Kurla Bus Accident Inside Video : अपघात घडल्यानंतर बसचालकाने नेमकं काय केलं? CCTV फुटेज आलं समोर


पुष्पा 2 ने देशभरात दमदार कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने भारतात 687 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकड्यांमुळे 'पुष्पा 2' ने प्रत्येक बिग बजेट चित्रपटाला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. या यशामुळे आता अल्लू अर्जुन भारतातला मोठा स्टार म्हणून समोर आला आहे. पहिल्याच आठवड्यात पुष्पाने हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT