Navina Bole: "कपडे काढ आणि..." मराठी अभिनेत्रीने सिने इंडस्ट्री टाकली हादरवून, साजिद खानवर गंभीर आरोप!
नवीना बोले ही प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करते. नवीना बोले हीने दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. सुभोजित घोष यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतमध्ये नवीनाने इंडस्ट्रीमध्ये 'कास्टिंग काउच'वर भाष्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिनेत्री नवीना बोले हीचे साजिद खानवर गंभीर आरोप

दिग्दर्शक साजिद खान यांनी विचित्र मागणी केल्याचा आरोप

नवीना बोले काय काय म्हणाली, वाचा....
Navina Bole Allegations on Sajit Khan : 'इश्कबाज'मधील भूमिकेतून लोकांपर्यंत पोहोचलेल्या अभिनेत्री नवीना बोले हीने दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. साजिद खान यांनी आपल्याला 'कपडे काढून समोर बसायला सांगितलं होतं' असा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुभोजित घोष यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतमध्ये नवीनाने इंडस्ट्रीमध्ये 'कास्टिंग काउच'वर भाष्य केलं. साजिदने मला आपल्या घरी बोलावून विचित्र मागण्या केल्याचा आरोप तिने केला आहे. या मुलाखतीत नवीना म्हणाली, "माझ्या आयुष्यात एक भयानक माणूस आला होता. ज्याला मी पुन्हा कधीच भेटू इच्छित नाही. त्याचं नाव साजिद खान होतंस तो आमच्यापैकी अनेकांच्या मागे लागला होता, महिलांचा अनादर करण्यात त्याने खरंच कंबर कसली होती."
हे ही वाचा >> Pahalgam Terror Attack: "माझा मुलगा हे करू शकत नाही..." दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा
'हे बेबी' चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान साजिदसोबत झालेल्या तिच्या भेटीबद्दल बेलताना नवीना म्हणाली, "जेव्हा त्यानं मला फोन केला, तेव्हा मी खूप उत्साहित होते. नंतर तो अक्षरशः मला म्हणाला की, तू कपडे उतरवून तुझ्या अंतर्वस्त्रात माझ्यासमोर का बसत नाहीस, मला पाहायचं आहे की तू किती कम्फर्टेबल आहेस. मी 2004 आणि 2006 दरम्याचं सांगतेय, तेव्हा मी ग्लॅडरॅग्ज केलं होतं."
कोण आहे नवीना बोले?
नवीना बोले ही प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करते. 30 ऑक्टोबर 1983 ला मुंबईमध्ये तिचा जन्म झाला होता. तिने कॉमर्समध्ये पदवी घेतली असून, ती शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिने मॉडेलिंगपासून करिअर सुरू केलं आणि नंतर टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. ती स्टार प्लसवरच्या "इश्कबाज" या मालिकेत टियाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. याशिवाय तिने "मिले जब हम तुम", "सपना बाबुल का... बिदाई", "कुमकुम भाग्य", "यम हैं हम" यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 4 मार्च 2017 रोजी नवीनाने अभिनेता-निर्माता जीत करनानी यांच्याशी लग्न केलं होतं. नंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हे ही वाचा >> "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव
नवीनाने असंही सांगितलं की, साजिदने एक वर्षानंतर मिसेस इंडियामध्ये भाग घेत असताना तिच्याशी पुन्हा संपर्क साधला. ती म्हणाली, "त्याने मला पुन्हा फोन केला आणि विचारलं, 'तू काय करतेस, तू माझ्याकडे एका रोलसाठी यायला पाहिजे.' हा माणूस इतक्या महिलांना त्रास देत असावा, की त्याला आठवतही नसेल की वर्षभरापूर्वी त्याने मला त्याच्या घरी बोलावले होतं आणि त्याने आधीच मला खूप त्रास दिला होता."