तनुश्री दत्ताचं 'हे' आहे गुपित वजन कमी करण्याचं, फक्त...

मुंबई तक

Tanushree Dutta weight: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तब्बल 18 किलो वजन करून तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. जाणून तिचं वजन कमी करण्याचं नेमकं गुपित काय ते.

ADVERTISEMENT

तनुश्री दत्ताने घटवलं 18 किलो वजन (फोटो: iamtanushreeduttaofficial /Instagram)
तनुश्री दत्ताने घटवलं 18 किलो वजन (फोटो: iamtanushreeduttaofficial /Instagram)
social share
google news

Tanushree Dutta: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने तब्बल 18 किलो वजन कमी केले आहे. 18 किलो वजन कमी केल्यानंतर, आता ती तिच्या जुन्या लूकमध्ये परतली आहे. तनुश्रीने सांगितले की, तिने 18 महिन्यांत 18 किलो वजन नेमकं कसं कमी केलं आहे. (bollywood actress tanushree dutta lost 18 kg weight you should also know her weight loss secret)

तनुश्रीने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने आपला आहार एकदम योग्य प्रमाणात घेतला, त्यामध्ये तिने कुठेही तडजोड केली नाही. 

वजन कमी करण्यासाठी तिने जिममध्ये बराच घामही गाळला. तनुश्रीने काही काळापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, "लोकांना वाटते की हे अचानक घडले आहे, परंतु काहीही अचानक नसते. मी यावर बराच काळ काम करत होते.'

याआधी तनुश्रीचे वजन खूप वाढले होते, ज्यामुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले होते. तिचे वाढते वजन पाहून तिचे चाहते अनेकदा तिला वजन कमी करण्याचा सल्लाही द्यायचे.

याबाबत तनुश्रीने सांगितले की, ती एकदा उज्जैनमधील एका मंदिरात गेली होती जिथे तिने संपूर्ण दिवस उपवास केला. या काळात तनुश्रीला खूप हलके आणि बरे वाटले, त्यानंतर तिने दर सोमवारी उपवास करायला सुरुवात केली.

या काळात ती दररोज व्यायामही करायची ज्यामुळे तिचे वजन हळूहळू कमी होऊ लागले. वजन कमी झाल्यामुळे प्रोत्साहित होऊन तिने जिममध्ये अधिक व्यायाम करण्यास सुरूवात केली.

तनुश्रीने तिच्या आहारातून कार्ब्स, साखर, ग्लूटेन वगळले आणि ती फक्त ज्यूस, सूप आणि सॅलड सारख्या आरोग्यदायी गोष्टी खात असे.

 

यासोबतच वेट ट्रेनिंग, इंटरमिटंट फास्टिंग, योगा आणि पोहणे यासारख्या गोष्टी देखील तिने केल्या, त्यानंतर तिचे वजन 80 किलोवरून 62 किलोपर्यंत कमी झाले.

तनुश्री दत्ता ही मी टू या चळवळीमुळे अधिक चर्चेत आली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात तिने अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.

दरम्यान, यथावकाश हे संपूर्ण प्रकरण मागे पडलं. पण तरीही तनुश्री ही अद्यापही अनेकदा या सगळ्या संदर्भात तिचं म्हणणं माध्यमांसमोर मांडतच असते.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp