Maharani 3 Teaser : ‘महाराणी’ सत्तेच्या खुर्चीवर पुन्हा करणार राज्य, दमदार टीझर रिलीज!
‘महाराणी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी हुमा कुरेशी लवकरच या सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये आपली दमदार भूमिका दाखवताना दिसणार आहे. यादरम्यान, हुमाच्या ‘महाराणी 3’ चा नुकताच टीझरही रिलीज झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
ADVERTISEMENT
Maharani 3 Teaser Released : ‘महाराणी’ (Maharani) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारी हुमा कुरेशी (Huma Qureshi) लवकरच या सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये आपली दमदार भूमिका दाखवताना दिसणार आहे. यादरम्यान, हुमाच्या ‘महाराणी 3’ चा नुकताच टीझरही रिलीज झाला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. (Huma Qureshi’s Maharani Web series season 3 Teaser Released)
ADVERTISEMENT
हुमा कुरेशीने ‘महाराणी’ या वेबसिरीजच्या पहिल्या दोन सीझनद्वारे चाहत्यांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली आहे. मंगळवारी (16 जानेवारी) हुमाच्या सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा म्हणजेच ‘महाराणी 3’चा लेटेस्ट टीझर रिलीज झाला आहे. प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Sony Liv ने त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर दिग्दर्शक सौरभ भावे दिग्दर्शित महाराणी 3 चा हा टीझर व्हिडीओ लॉन्च केला आहे.
वाचा : Maratha Reservation: जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं ‘मुंबईत गोळ्या झेलण्यास…’
यावेळी प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार?
या टीझर व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, यावेळी राणी एका नव्या आणि मोठ्या तयारीसह बिहारच्या राजकारणाचे सिंहासन हादरवताना दिसणार आहे. महाराणी 3 च्या टीझरमध्ये हुमा म्हणताना दिसत आहे, “आम्ही चौथी नापास असून तुमचं जगणं मुश्कील केलं असेल तक विचार करा ग्रॅज्युएट झालो तर काय करू.”
हे वाचलं का?
‘महाराणी 3’ च्या या टीझरमध्ये, हुमा कुरेशी व्यतिरिक्त, आपल्याला नवीन कुमारची भूमिका करणारे ज्येष्ठ चित्रपट कलाकार आणि अभिनेते अमित सियाल देखील दिसणार आहेत.
वाचा : Sushil Kumar Shinde : भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?
महाराणीचे पहिले दोन सिझन यशस्वी
यापूर्वी, सोनी लिव्हच्या ‘महाराणी’ या वेब सीरिजचे दोन सीझन रिलीज झाले होते, ज्याची सुरुवात 2021 मध्ये झाली होती. यानंतर या सिरीजचा दुसरा सीझन 2022 मध्ये प्रसारित झाला. हे दोन्ही सीझन प्रेक्षकांना आवडले आणि हुमा कुरेशीच्या ‘महाराणी’ भूमिकेचे दोन्ही सीझन यशस्वी झाले. अशा परिस्थितीत ‘महाराणी 3’ कशी कामगिरी करेल हे लवकरच समजेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT