Janhvi Kapoor: खटक्यावर बोट जाग्यावर पलटी... जान्हवीचा नादखुळा लूक!
Janhvi Kapoor Hot Look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अनोख्या फॅशनसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी, ती मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसली होती, जिथे तिच्या फॅशनेबल ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाल्मेनच्या मिनी ड्रेसमधील जान्हवी कपूरची ग्लॅमरस स्टाईल

जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते नादावले

पाहा जान्हवी कपूरचे खास फोटो
Janhvi Kapoor Hot Pics: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. ती पाश्चात्य ते एथनिक अशा प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसते. काही दिवसांपूर्वी, ती मुंबईतील वांद्रे येथील Los Cavos रेस्टॉरंटच्या बाहेर दिसली होती, जिथे तिच्या मिनी ड्रेस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा लूक खूप आवडला आहे.
जान्हवीच्या ग्लॅमरस लूकमध्ये घायाळ करणाऱ्या अदा
यावेळी जान्हवीने फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस बाल्मेनचा एक एमब्लिशड वूल मिनी ड्रेस निवडला. काळ्या ब्लेझरसारख्या या ड्रेसवर पांढऱ्या लेपल्ससारखे डिटेलिंग आणि गोल्डन बटणं होती, ज्यामुळे तो आणखी सुंदर दिसत होता.
हे ही वाचा>> Nora Fatehi: ट्रेनने रत्नागिरी गाठलं, मराठमोळ्या मित्रासाठी नोरा हळदीतही थिरकली
ड्रेसची फिटिंग खूपच परफेक्ट होती, त्यामुळे तिचे कर्व्स चांगलेच हायलाइट होत होते. डीप व्ही-नेकलाइन आणि साइड पॉकेट्ससह, मिनी ड्रेसची लांबी ही तिच्या मांड्यांपर्यंत होती, जो जान्हवीच्या टोन्ड पायांना चांगल्या प्रकारे हायलाइट करत होतं.
हे ही वाचा>> Janhvi Kapoor: बाई... जान्हवीने फ्लाँट केली फिगर, तुम्हीही म्हणाल हिचा तर कहर!
नो अॅक्सेसरीज आणि नैसर्गिक मेकअप
ग्लॅमरस ड्रेसमध्ये भर घालण्यासाठी जान्हवीने दागिन्यांचा फारसा वापर केला नाही. तिने सोनेरी कानातले घातले होते आणि पॉईंटेट ब्लॅक हिल्स कॅरी केले होते.. तिचा लूक पूर्ण करताना, तिने नैसर्गिक मेकअपसह गुलाबी आयशॅडो लावलेला, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक साधा पण अत्यंत आकर्षक वाटत होता.
जान्हवीचा हा जबरदस्त लूक लोकांन इतका आवडला आहे की, हा बाल्मेन ड्रेस आता वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध नाही. काळ्या मिनी ड्रेसमधील हा लूक केवळ लेट-नाइटसाठी परफेक्टच नाही, तर जान्हवी कपूरची फॅशन सेन्स प्रत्येक वेळी एक नवीन स्टाइल स्टेटमेंट सेट करते हे देखील सिद्ध करतं.