लता मंगेशकरांचं ‘श्रद्धा कपूर’शी आहे खास नातं; पहा कुटुंबासोबतचे दुर्मिळ फोटो

मुंबई तक

आपल्या आवाजाने हजारो गाण्यांना अजरामर करणाऱ्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिने आणि संगीत विश्वात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. वयाच्या १३व्या वर्षापासून गायनाचा प्रारंभ करणाऱ्या लता मंगेशकर यांचं कुटुंबावर प्रचंड प्रेम होतं. त्यांचे कुटुंबीयांसोबचे दुर्मिळ फोटो आपण पाहणार आहोत… लता मंगेशकर या सर्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आपल्या आवाजाने हजारो गाण्यांना अजरामर करणाऱ्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिने आणि संगीत विश्वात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. वयाच्या १३व्या वर्षापासून गायनाचा प्रारंभ करणाऱ्या लता मंगेशकर यांचं कुटुंबावर प्रचंड प्रेम होतं. त्यांचे कुटुंबीयांसोबचे दुर्मिळ फोटो आपण पाहणार आहोत…

लता मंगेशकर या सर्व भावंडामध्ये मोठ्या होत्या. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होतं. तर आईचं नाव शेवंती होतं. लता मंगेशकर यांना घरातूनच संगीताचा वारसा मिळाला.

लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. दीनानाथ मंगेशकर यांच्या कामाची सगळीकडेच चर्चा असायची.

जन्मानंतर लता मंगेशकर यांचं नाव हेमा ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटकातील लतिका नावाच्या भूमिकेवरून त्यांचं नाव लता असं ठेवण्यात आलं. दीनानाथ मंगेशकर यांना पाच अपत्य होती.

पाच भावंडांमध्ये लता मंगेशकर सर्वात मोठ्या होत्या. मीना मंगेशकर, आशा मंगेशकर, उषा मंगेशकर आणि भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर अशी त्यांच्या भावडांची नावं आहेत. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या बहिणी व भाऊही गायक आहे.

लता मंगेशकरांना संगीताचं शिक्षण त्यांच्या वडिलांनीच दिलं. वयाच्या पाचव्या वर्षापासून लता मंगेशकरांनी संगीत शिकण्यास सुरूवात केली होती.

लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना मंगेशकर कुटुंबीयांवर काळाने मोठा आघात केला. दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर विनायक दामोदर कर्नाटकी यांनी मंगेशकर कुटुंबाची काळजी घेतली. विनायक यांनीच लता मंगेशकरांना संगीत आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास मदत केली.

वडील गेल्यापासूनच लता मंगेशकरांनी आपल्या भावंडाबरोबरच कुटुंबाची काळजी घेण्यास सुरूवात केली. अविवाहित राहून त्यांनी बहिणी आणि भावाला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उभं करण्यास मदत केली.

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिच्या कुटुंबासोबतही लता मंगेशकर यांचे जवळचे संबंध आहेत. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कपूर आणि मावशी पद्मिनी कोल्हापुरे लता मंगेशकर यांच्या भाच्या आहेत, तर श्रद्धा लता मंगेशकर यांची पणती आहे.

श्रद्धा कपूरचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे होते. लता मंगेशकर यांचे कुटुंबीयांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp