Krishnaraaj Mahadik: रिंकू राजगुरुचं महाडिकांच्या 'परशा'शी होणार लग्न? खुद्द कृष्णराज महाडिकांनी सांगितली Inside Story

मुंबई तक

Krishnaraaj Mahadik On Rinku Rajguru :  सैराट चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात घरा घरात पोहोचलेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय.

ADVERTISEMENT

Krishnaraaj Mahadik On Rinku Rajguru
Krishnaraaj Mahadik On Rinku Rajguru
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूच्या त्या व्हायरल फोटोची तुफान चर्चा

point

...म्हणून कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूच्या लग्नाच्या चर्चांना आलं उधाण

point

कृष्णराज महाडिक यांनी दिली मोठी प्रतिक्रिया

Krishnaraaj Mahadik On Rinku Rajguru :  सैराट चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात घरा घरात पोहोचलेली आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. कारण कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी रिंकू राजगुरुसोबतचा एक फोटो शेअर केला होता. कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात कृष्णराज आणि रिंकून एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर कृष्णराज यांच्या सोशल मीडिया हँडलवर दोघांचा फोटो शेअर करण्यात आला. त्यानंतर रिंकू आणि कृष्णराजच्या लग्नाच्या चर्चांना एकच उधाण आलं. नेटकऱ्यांनी या दोघांच्या लग्नाबाबतच्या कमेंट्सचा वर्षाव केल्यानंतर खुद्द कृष्णराज महाडिक यांनी साम टीव्हीवर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

रिंकू राजगुरुसोबत लग्नाच्या चर्चांवर कृष्णराज महाडिक काय म्हणाले?

"माझी सर्वांना विनंती आहे की, प्लिज फोटोबद्दल गैरसमज करून घेऊ नका. त्या (रिंकू राजगुरू) माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. कोल्हापूरला एक कार्यक्रम होता म्हणून त्या आल्या होत्या. त्यादरम्यान आमची भेट झाली. आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तो फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीमकडून पोस्ट केला गेला. त्यावरून खूप अफवा बाहेर पडत आहेत. आमच्यामध्ये तसं काही नाहीय. दोन्ही कुटुंबात विचारलं जात आहे की नेमकं काय चालू आहे, परंतु, तसं काही नाहीय. आम्ही ठरवूनच भेटलो होतो", असं महाडिक यांनी म्हटलंय.

हे ही वाचा >> Nitesh Rane : "राज्यातील मदरसे अतिरेक्यांचे अड्डे...", पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती

"आम्ही मंदिरात दर्शनासाठीही एकत्र गेलो होतो. पण फोटोचा अर्थ वेगळा काढला जात आहे. माझ्या रिसेन्ट ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती. त्यामुळे काही लोकांना तसं वाटत असेल. आम्ही चांगले फ्रेंड आहोत. त्यापलीकडे आमच्यात तसं काहीही नाहीय. मी सर्वांना विनंती करत आहे की, आपण तसं काही समजू नका. माझं लग्न कधी होणार आहे, काय होणार आहे, त्याबद्दल मला काहीही माहित नाही. माझ्या कुटुंबात तशा चर्चा सुरु असतात", असंही महाडिक म्हणाले. 

हे ही वाचा >> Sanjay Raut : "पवारांकडून शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार, आम्हालाही राजकारण कळतं"

दरम्यान, 'महाडिकांच्या घरी तिसरी सून येणार आहे', 'रिंकू कोल्हापूरची सून होणार', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कृष्णराज आणि रिंकूच्या फोटोवर दिल्या आहेत. कृष्णराज आणि रिंकू राजगुरूने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे नुकतंच दर्शन घेतलं. तसच रिंकूने कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या ‘राजर्षी शाहू महोत्सवात’ उपस्थितीही दर्शवली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर योगायोगाने कृष्णराज आणि रिंकूची भेट झाली. या भेटीनंतर कृष्णराजने इंटरनेटवर फोटो शेअर केला अन् दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp