Nitin Desai Suicide: बॉलिवूडला आपलंस करणारा कलाकार, कोण होते नितीन देसाई?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nitin desai who made his place in bollywood know in detail about bollywood news in marathi
nitin desai who made his place in bollywood know in detail about bollywood news in marathi
social share
google news

मुंबई: 2 ऑगस्टची सकाळ झाली आणि सिनेसृष्टी हादरली! कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका उपासकाने स्वतःच्या आयुष्याला पूर्णविराम दिला. ज्यांच्या कला दिग्दर्शनाने असंख्य सिनेमांना अजरामर केले, त्या सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी (Nitin Desai Suicide) गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलंय. (nitin desai who made his place in bollywood know in detail about bollywood news in marathi)

वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी स्वतः उभारलेल्या स्टुडिओमध्येच टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

देसाईं यांच्या आत्महत्येचं वृत्त पसरताच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी हळहळली. नितीन देसाई अतिशय लोकप्रिय असे कला दिग्दर्शक होते, यासोबतच त्यांनी अनेक सिनेमाचं दिग्नदर्शन करण्यासोबतच अभिनयही केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, ‘ते’ प्रकरण काय?

अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सेट तयार केले होते. ‘लगान’, ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘माचिस’, ‘जोधा अकबर’, ‘हरिशचंद्राची फॅक्टरी’, ‘द लिजेड ऑफ भगत सिंग’, ‘परिंदा’, ‘बालगंधर्व’, ‘रंगीला’ अशा असंख्य हिंदी मराठी चित्रपटाचं कला दिग्दर्शन नितीन देसाईंनी केलं होतं.

नितीन देसाईंनी कला दिग्दर्शनासोबतच राजकीय रॅली आणि विविध कार्यक्रमांसाठीही सेट तयार केले होते. त्यांनी तयार केलेल्या सेटची नेहमीच चर्चा व्हायची. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून इतर सर्व राजकारण्यांशी खूप चांगले संबंध होते. नितीन देसाई यांनी 1980 च्या दशकात कला दिग्दर्शनाला सुरूवात केली होती. असंख्य सिनेमांमध्ये त्यांच्या आपल्या कला दिग्दर्शनाची छाप त्यांनी सोडली आहे.

ADVERTISEMENT

180 कोटींच्या कर्जामुळे गमावला जीव

2016 आणि 2018 साली नितीन देसाईंनी तब्बल 180 कोटींचं कर्ज घेतलं होतं. जेव्हा त्यांनी जे कर्ज घेतलं होतं… त्यावेळी त्यांनी स्टुडिओची जमीन आणि इतर काही संपत्ती या तारण ठेवल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षात देसाईंना कर्जाची रक्कम फेडता आली नाही. तसेच त्यावरील व्याजही त्यांना देता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं 180 कोटींचं कर्ज हे जवळजवळ 250 कोटींपर्यंत पोहचलं होतं. या सगळ्याचा तणाव त्यांना प्रचंड जाणवत होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nitin Desai Suicide अन् Audio क्लिप… ‘ते’ 4 उद्योजक कोण?, Inside स्टोरी

आता अशीही माहिती समोर येत आहे की, नितीन देसाईंनी जे कर्ज घेतल होतं. ते फेडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित फायनान्स कंपनीने देसाईंकडे तगादा लावला होता. पण देसाई यांना कर्जाची रक्कम चुकवता आली नाही. ज्यामुळे कंपनीने याबाबत जप्तीच्या कारवाईसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कोणतेही आदेश अद्याप तरी दिले नव्हते. मात्र, आपण आता या आर्थिक गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही याच नैराश्यातून नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचं सध्या बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT