रात्री नवरा घरी नसताना ममता बोलवायची मुलीच्या सासऱ्याला, आता व्याह्यासोबतच गेली पळून!
उत्तर प्रदेशातील बदायू शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आपल्याच मुलीच्या सासऱ्यासोबत टेम्पोमधून पळून गेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशातील महिला गेली मुलीच्या सासऱ्यासोबतच पळून

बायकोच्या कृत्याबद्दल काय म्हणाला तिचा नवरा?

आईच्या कृत्याबद्दल मुलगा काय म्हणाला?
बदायू: उत्तर प्रदेशातील बदायू शहरातील नातेसंबंधांना लाज आणणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ममता नावाची महिला आपल्याच मुलीचा सासरा शैलेंद्र उर्फ बिल्लू याच्यासोबत पळून गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यावेळी दोघांनी एकत्र जगण्या-मरण्याची वचनं घेतली आणि एका टेम्पोमध्ये बसून पळून गेले.
नात्याच्या मर्यादाच ओलांडल्या
ममताचे पती सुनील कुमार हे एक ट्रक ड्रायव्हर असून एके दिवशी ते लांबच्या प्रवासाला निघून गेले. तेव्हाच ही अनोखी आणि विचित्र प्रेमकहाणी सुरू झाली. यादरम्यान, ममताची तिच्या मुलीचे सासरे शैलेंद्र यांच्याशी जवळीक वाढली. यासंबंधी ममताचे पती सुनील म्हणाले, "मी महिन्यातून एक ते दोन वेळाच घरी येतो आणि वेळोवेळी पैसे देखील पाठवतो. परंतु, माझ्या बायकोने त्यावेळी आमचे व्याही म्हणजेच आमच्या मुलीच्या सासऱ्यांना घरी बोलवून नात्यांची मर्यादाच तोडली. आता ती घरातून पैसे आणि दागिने घेऊन ती त्याच्यासोबत पळून गेली आहे."
हे ही वाचा: जावई नाही आता तोच नवरा... सासूचा लग्नासाठी हट्ट, मुलगा आला समजवायला अनिता म्हणाली, 'येत नाही जा!'
आईच्या नको त्या कृत्यांबद्दल मुलानेही सारं काही सांगितलं
ममताचा मुलगा सचिन यानेही या नात्याचे सत्य उघड केले. सचिन म्हणाला, "पप्पा घरी नसल्यावर मम्मी दर तिसऱ्या दिवशी बहिणीच्या सासऱ्यांना घरी बोलवायची आणि आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवायची. आता ती त्याच्यासोबतच पळून गेली आहे." याबाबतीत त्यांचे शेजारी अवधेश कुमार म्हणाले की शैलेंद्र अनेकदा रात्री 12 वाजता यायचा आणि सकाळी निघून जायचा. तो त्यांचा नातेवाईक असल्याने परिसरातील लोकांना त्याच्यावर कोणताच संशय आला नाही. मात्र, आता सत्य सर्वांसमोर आले आहे.
हे ही वाचा: उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान! म्हणाले, "आमच्यातील गोष्टी किरकोळ..."
प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले
या संपूर्ण प्रकरणात सुनील कुमार यांनी त्याच्या मुलीच्या सासऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावर दातागंज क्षेत्र अधिकारी केके तिवारी म्हणाले, "एक महिला तिच्या व्याह्यांसोबत पळून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल."