Animal : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अॅनिमल’ सिनेमात रणबीर कपूरला अशा शैलीत पडद्यावर आणले आहे, या शैलीत आतापर्यंत तो कोणत्याच सिनेमात दिसला नव्हता. त्यामुळे प्रेक्षक ही त्याला अशाच भूमिकेत पाहण्यास उत्सुक होते.
ADVERTISEMENT
Animal Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. रणबीरचा ‘अॅनिमल’ सिनेमाने प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, या सिनेमाने ओपनिंगमध्ये अनेक हिट सिनेमांना मागे टाकत पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. दरम्यान रणबीरच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे, हे जाणून घेऊयात. (ranbir kapoor bollywood actor animal day 1 box office collection beats jawan gadar 2 tiger 3)
ADVERTISEMENT
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अॅनिमल’ (Animal) सिनेमात रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) अशा शैलीत पडद्यावर आणले आहे, या शैलीत आतापर्यंत तो कोणत्याच सिनेमात दिसला नव्हता. त्यामुळे प्रेक्षक ही त्याला अशाच भूमिकेत पाहण्यास उत्सुक होते. आणि चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग सुरू होताच तिकिटांची विक्री सुरू झाली. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 34 कोटी रुपयांची कमाई केली होती.
हे ही वाचा : Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story
ट्रेड रिपोर्ट्नुसार ‘अॅनिमल”ने पहिल्या दिवशी 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सॅकनिल्क नुसार, ‘अॅनिमल’ ने पहिल्या दिवशी सुमारे 61 कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदी आवृत्तीची कमाई 50 कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तेलुगू इंडस्ट्रीतून पदार्पण करणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनाही देशांतर्गत बाजारपेठेचा फायदा झाला असून तेलुगू आवृत्तीने 10 करोडची कमाई केली आहे. दरम्यान समोर आलेल्या आकड्यांमध्ये थोडाफार फरक असू शकतो, पण चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन जवळपास त्याच रेंजमध्ये असेल.
हे ही वाचा : Rohit Pawar : अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”
रणबीरच्या ‘अॅनिमल’ने वर्षातील दुसरी सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. 40.10 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘गदर 2’ आणि पहिल्याच दिवशी 44 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ‘टायगर 3’ला तसेच शाहरुख खानच्या ‘पठाण’ या मोठ्या चित्रपटाला ‘अॅनिमल’ने मागे टाकले आहे.
ADVERTISEMENT
‘अॅनिमल’ने पहिल्या दिवशी सांगून टाकले आहे की त्यांच्यासमोर बॉक्स ऑफिसचे मोठे रेकॉर्ड कमी पडणार आहेत. सोशल मीडियावर लोकांच्या भरघोस प्रतिसादानंतर पहिल्या वीकेंडमध्ये ‘अॅनिमल’ किती कमाई करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT