एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?
गिरीश महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. तसंच त्यांनी जो दावा केलाय, त्याचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपण हे केले नसून, अनिल थत्ते यांनी ते केले आहेत असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गिरीश महाजन यांच्याबद्दल काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसे यांनी ज्या अनिल थत्तेंचं नाव घेतलं ते कोण?

एकनाथ खडसे यांनी ज्या महिला अधिकाऱ्याचं नाव घेतलं त्या कोण?
Eknath Khadse Vs Girish Mahajan : एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातला वाद नवा नाही. दोघांमध्ये आता पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात एका महिला अधिकाऱ्याचाही उल्लेख केला जातोय. महिला अधिकाऱ्याचा उल्लेख होत असल्यानं या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा >>सोवळं-जाणवं नसल्यानं रामदास तडस यांना रोखलं, रामनवमीच्या दिवशी मंदिरात काय घडलं?
आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याच्या जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. त्यानंतर या चर्चेला सुरूवात झाली. महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप करत, त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
'गृहमंत्र्यांनीही केली होती चौकशी'
"2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात सामील करून घेण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाजन यांना याबद्दल विचारणा केली होती. तेव्हा त्यांनी महिला आयएएस अधिकाऱ्याशी असलेल्या कथित संबंधांवरुन प्रश्न उपस्थित केले होते" असा दावा खडसे यांनी केला होता.
गिरीश महाजन यांचं उत्तर
गिरीश महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले. तसंच त्यांनी जो दावा केलाय, त्याचे पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय. महाजन म्हणाले, "खडसे यांच्याबद्दल बोललो तर ते समाजात कुणालाही तोंड दाखवू शकणार नाहीत. मी ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहे ते त्यांच्याच घराशी संबंधित आहे. मी हे प्रकरण उघड केलं तर लोक त्यांना मारतील."
हे ही वाचा >> आईच्या प्रियकरानेच केला 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, दिवसभर घरी असताना अनैसर्गिक कृत्य
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, 'माझ्याविरोधात कोणताही पुरावे दाखवा. माझं त्यांना आव्हान आहे. त्यांनी पुरावे दाखवले, तर मी सार्वजनिक जीवनाचा राजीनामा देईन. पुन्हा तोंड दाखवणार नाही. महाजन यांनी पुढे असाही सवाल केला की, ते खोटे दावे का करत आहेत? खोटं पसरवताना त्यांना लाज वाटत नाही का?
एकनाथ खडसे यांनी ज्या व्हिडीओच्या संदर्भ देत हे वक्तव्य केलं होतं, ते अनिल थत्ते नेमकं काय म्हणाले होते, ते पाहणं महत्वाचं आहे. अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्याबद्दलच्या गोष्टी अनिल थत्ते यांनी सांगितलं आहे. माझी विश्वासार्हता, नैतिकता पनाला लावून मी हा गौप्यस्फोट करतोय असं म्हणत अनिल थत्तेंनी मुनगंटीवार आणि महाजन यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या.
अनिल थत्ते कोण, ते काय म्हणाले?
"गिरीश महाजन हे मंत्रिमंडळात आहेत. अमित शाह त्यांना म्हणाले, तुम्ही मंत्रिमंडळात असाल, पण तुम्ही काही गोष्टींचा खुलासा केलात तर चांगलं होईल. माझ्याकडे सगळेच डीटेल्स आहेत. ते म्हणाले तुम्ही खूप काम करता, अभिनंदन. पण तुम्ही रात्री, बेरात्री महिला आयएएस अधिकाऱ्यांना फोन करता. त्यावर महाजन म्हणाले, हो मी उशिरापर्यंत काम करतो. त्यांना अमित शाहांची गुगली कळलीच नाही. त्यामुळे ते म्हणाले, आयएएस असलेल्या महिला अधिकाऱ्याला तुम्ही रात्री एकनंतर किती फोन केले. त्यावर महाजन म्हणाले, मी सर्वांनाच फोन करतो...त्यावर अमित शाह म्हणाले, तुम्ही 100 हून जास्त वेळा एका महिला अधिकाऱ्याला फोन केले. महिला अधिकाऱ्यानं तक्रार केलेली नाही, पण हे तुमच्या कॉल रेकॉर्डमध्ये सापडलं. असं काय तुम्ही काम करता? गिरीशजी हम आपको बेनिफीट ऑफ डाऊट दे रहें है, और मंत्रिमंडळ में ले रहें है..."
अनिल थत्ते हे गगनभेदी या आपल्या सदरामधून नेहमी अशा राजकीय विषयांवर वेगवेगळे गौप्यस्फोट करत असतात.
अनिल थत्ते हे मराठी पत्रकार, ज्योतिषी आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. एकूणच त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे यापूर्वी अनेकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आहे.