रेल्वेत कामाला असणाऱ्या नवऱ्याला पत्नीने संपवलं! त्याच्याच भावाला केला फोन, बोलावलं घरी अन्...
Viral News : उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेने (शिवानी) तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दीपकच्या कुटुंबियांनी शिवनी विरोधात तक्रार दाखल केली

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आली खळबळजनक माहिती

दीपकचा मृत्यू नेमका कसा झाला?
Crime News : उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेने (शिवानी) तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. पतीचा (दीपक) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, अशी खोटी माहिती या महिलेने तिच्या कुटुंबियांना दिली. परंतु, मृत दिपकच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली. त्यानंतर मृताच्या कुटुंबियांनी शिवानीवर हत्येचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव दिपक आहे. तो रेल्वेमध्ये टेक्नीशियनच्या पदावर कार्यरत होता. दीपक त्याची पत्नी शिवानी आणि 6 महिन्यांच्या मुलासोबत बिजनौरच्या नजीबाबादच्या आदर्शनगरमध्ये राहत होता. रिपोर्टनुसार, 4 एप्रिलच्या रात्री 1 वाजताच्या सुमारास दीपकच्या पत्नीने दिपकच्या भावाला फोन केला. यावेळी शिवानीने त्याला सांगितलं की, तुझा भाऊ चक्कर येऊन खाली पडला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, असं वाटत आहे. लवकर घरी ये..त्यानंतर मृत दिपकच्या भावाने घडलेला सर्व प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितलं. दीपकचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला आहे, अशीही माहिती दिपकच्या भावाला मिळाली.
हे ही वाचा >> एकनाथ खडसे, मंत्री गिरीश महाजन आणि ती महिला अधिकारी... प्रकरण नेमकं काय?
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आली खळबळजनक माहिती
मृत दीपकचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व कहाणीच पलटली. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, दिपकचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला नाहीय. तर दीपकला गळा दाबून मारण्यात आलंय. ही धक्कादायक माहिती समोर येताच मृत दिपकच्या कुटुंबियांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांनी दीपकची पत्नी शिवानीवर हत्येचा आरोप लावला. शिवानीनेच दीपकची हत्या केली, असा संशय तिच्या कुटुंबियांना आहे. दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला नाही, मग त्याच्या पत्नीने खोटी माहिती का सांगितली?
हे ही वाचा >> अमर आणि प्रेमचा खास 'अंदाज' पुन्हा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार, भाईजानने सांगितली तारीख
दीपकच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली
दीपकच्या हत्या प्रकरणात शिवानीसोबत आणखी कुणाचा तरी सहभाग आहे, असा संशयही दीपकच्या कुटुंबियांना आहे. दरम्यान, दीपकच्या हत्या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून अनेक लोकांची कसून चौकशी केली जात आहे.