'शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यावरून सुटलेले', राहुल सोलापूरकरचं 'ते' वादग्रस्त विधान जसंच्या तसं..

मुंबई तक

'शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले त्यात मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं आहे.

ADVERTISEMENT

राहुल सोलापूरकरचं वादग्रस्त विधान
राहुल सोलापूरकरचं वादग्रस्त विधान
social share
google news

मुंबई: 'शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले त्यात मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत.' असं वादग्रस्त विधान अभिनेते राहुल सोलापूरकरने केलं आहे. ज्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

पाहा राहुल सोलापूरकरचं विधान जसंच्या तसं... 

'आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकलेले आहोत.. शिवनेरीचा जन्म, मग काय नंतर पुण्याला आले.. गोष्टी रुपातच.. हे खरं नाहीच..' 

'गमंत म्हणून सांगतो आता.. महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की, गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे. यामधून ती निर्माण ती कथा आहे की, जिने गडावरून उडी मारलेली.. हिरकणी घडलेलीच नाही. असा काही नाहीए. मी रायगडावर फिल्म केली आहे. असं काही नाहीए. असा इतिहासच नाही. पण लिहिलं गेलं.'

'किंवा महाराज आग्र्यावरून सुटले मिठाईचे पेठारे वैगरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आलेत महाराज.. त्यासाठी किती हुंडा वटवलाय ते सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलीए महाराजांनी. मोहसीन खान की मोमीन खान नाव आहे त्याचं बहुतेक... त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवान्याने घेऊन सगळे बाहेर पडले आहेत.' 

'स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. गोष्टी रुपात सांगताना मग ते लोकांना रंजक करून सांगावं लागतं. ती रंजकता आली की, इतिहासाला थोडासा छेद जातो.' असं विधान राहुल सोलापूरकरने एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलं आहे.

सुषमा अंधारे यांची तुफान टीका 

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांच्या या विधानानंतर शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'ही तीच पिलावळ आहे, ज्यांना या मातीतील चार्वाक, बसवेश्वर, बुद्ध, छत्रपती शिवराय, विश्वरत्न बाबासाहेब, म.ज्योतिबा फुले, म. गांधी हे आदर्श मोडीत काढून गोळवलकर हेडगेवार मुखर्जी हे नवे आदर्श प्रस्थापित करायचे आहेत..  हे सांस्कृतिक राजकारण ओळखा.' असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे. तसंच त्यांच्याविरोधात सभागृहात आवाज उठवणार असल्याचंही म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp