अमिषा पटेल सलमानशी लग्न करणार? म्हणाली, 'मी तर तेव्हापासून फक्त...'

मुंबई तक

Ameesha Patel and Salman Khan: बॉलिवूडमधील अभिनेत्री अमिषा पटेल आणि दबंग सलमान खान यांच्या लग्नाची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. जाणून घ्या याबबात अमिषा पटेल नेमकं काय म्हणाली

ADVERTISEMENT

अमिषा पटेल सलमानशी लग्न करणार?
अमिषा पटेल सलमानशी लग्न करणार?
social share
google news

मुंबई: बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री अमिषा पटेल ही आता 49 वर्षांची आहे. पण तिने अजूनही लग्न केलेले नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडचा सर्वात हँडसम अभिनेता सलमान खान हा देखील अजूनही बॅचलर आहे. अशावेळी आता सलमान खान आणि अमिषा पटेल यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर काहीतरी नवीन ऐकायला मिळत आहे. जिथे काही यूजर्सने सलमान आणि अमिषा यांना मोस्ट एलिजिबल बॅचलरचा टॅग दिला आहे. एवढेच नाही तर सलमान आणि अमिषाचे लग्न व्हावे अशी या चाहत्यांची इच्छा आहे. जेणेकरून त्या दोघांनाही सुंदर मुलं होतील.

हे ही वाचा>> Sunny Leone : लाडकी बहीणसारखीच छत्तीसगड सरकारची योजना, लाभार्थ्यांमध्ये सनी लिओन, दर महिन्याला किती रुपये?

एका पॉडकास्टमध्ये अमिषा म्हणाली, "ट्विटरवर जेव्हापासून ही चर्चा सुरू झाली की, मी सलमानशी लग्न करावं जेणेकरून आमची सुंदर-सुंदर मुलं होतील..  तेव्हापासून मी फक्त हसत आहे."

अमिषा आणि सलमान हे दोघेही अद्यापही बॅचलर आहेत. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या दोन देखण्या लोकांनी लग्न करायला हवं. असा आग्रहच अनेक यूजर्सने धरला आहे. जेणेकरून त्यांना सुंदर दिसणारी नवीन पिढी पाहता येईल. 

पण या सगळ्या गोष्टी ऐकून मला हसू येत असल्याचं अमिषाचं म्हणणं आहे. दरम्यान, यानंतर अमिषाने दबंग सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या दयाळूपणाबद्दलही भाष्य केलं.

हे ही वाचा>> BBL Surgery : परफेक्ट फिगरसाठी मॉडेल्स करतात ती बट लिफ्ट सर्जरी म्हणजे काय? मृत्यूचा धोका असूनही दरवर्षी...

ती म्हणते- 'सलमान एक अद्भुत व्यक्ती आहे. लोक त्याला मूडी म्हणतात. पण तो मित्रांचा मित्र आहे. तो कोणालाही मदत करतो. त्याच्यामुळेच अनेक लोक त्यांचे घर चालवू शकतात. त्याने अनेक लोकांची घरं वसवली आहेत. तो क्रू मेंबर्सनाही मदत करतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना नोकऱ्या आणि करिअर त्याच्यामुळेच झालं आहे.'

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमिषाचा शेवटचा मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट गदर-2 होता. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. सध्या अमिषा पटेल ही चित्रपटांमध्ये कमी आणि कार्यक्रमांमध्ये जास्त दिसते.

(सर्व फोटो: इंस्टाग्राम - ameeshapatel9)

हे वाचलं का?

    follow whatsapp