कभी कभी,चांदनी,सिलसिला या सुपरहिट सिनेमांचे लेखक सागर सरहदी यांचं निधन
कभी कभी,चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक सागर सरहदी यांचं रविवारी रात्री मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. सागर सरहदी हे ‘कभी कभी’, चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले […]
ADVERTISEMENT
कभी कभी,चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक सागर सरहदी यांचं रविवारी रात्री मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
सागर सरहदी हे ‘कभी कभी’, चांदनी आणि सिलसिला या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जायचे. सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ मध्ये पाकिस्तानात झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत आले. दिल्लीत काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर संघर्ष करत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं.
यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटामुळे सागर सरहदी यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली होती. तसंच त्यांनी अनेक गाजेलल्या चित्रपटासांठी संहिता लेखन केलं आहे. यात सिलसिला (१९८१), चांदनी (१९८९), रंग (१९९३), जिंदगी (१९७६); कर्मयोगी, कहो ना प्यार है, कारोबार, बाजार आणि चौसर सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT