Wagh Nakh History : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये कशी पोहोचली?
chhatrapati shivaji maharaj wagh nakh : अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी वध केला. ही वाघनखे लंडनमधील संग्रहालयात असून, ती परत आणली जाणार आहेत.
ADVERTISEMENT
Shivaji Maharaj Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास शस्त्र ‘वाघनखे’ लवकरच देशात परत आणण्याची तयारी सुरू आहे. या वाघनखानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. वाघनखे गेल्या अनेक दशकांपासून लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी आता ते ‘वाघनखे’ परत करण्याचे मान्य केले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिवाजी काळातील हे खास शस्त्र परत येणार आहे. ते परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, विभागाचे प्रधान सचिव, संचालक, पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय यांच्या शिष्टमंडळाने लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आणि इतर संग्रहालयांना भेट दिली आणि तेथे एक करार झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही ‘वाघनखे’ एक ऐतिहासिक अनमोल ठेवा मानला जातो आणि त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. वाघाच्या पंजाप्रमाणे हे शस्त्र असून, ‘वाघनखे’ ब्रिटनमधून परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाघनखांची कथा काय?
छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या पुस्तकानुसार ही घटना 1659 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काम करावे, मांडलिकत्व पत्करावं म्हणून विजापूर संस्थानाचा राजा आदिल शाह याने अफझलखानाला शिवाजी महाराजांकडे पाठवले होते.
हेही वाचा >> चंद्राबाबू नायडूंना अटक झालेलं 371 कोटी घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दोन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन भेटीला गेले होते. अफजलखान पाच जणांसह तेथे आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या हेतूबद्दल आधीच संशय आला होता आणि त्यामुळेच ते पू्र्ण तयारीनिशी आले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महिलेचं अपहरण करून निर्जनस्थळी नेले, नग्न होण्यास भाग पाडलं आणि…,डोंबिवलीत काय घडलं?
अफझलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. असा काही हल्ला होऊ शकतो, याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच कल्पना होती. अफझल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने हल्ला करताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब आपले खास शस्त्र वाघनखे काढून अफझलखानाला ठार केले.
ADVERTISEMENT
वाघनखे काय आहे?
वाघनखे हे मजबूत धातूपासून बनवलेले शस्त्र आहे, ज्यात वाघाच्या पंजाच्या नखांप्रमाणे धारदार दांडके जोडलेले असतात. ती व्यक्तीच्या हाताच्या मुठीत बसते. याच्या दोन्ही बाजूंना अंगठी असते जी हाताच्या पहिल्या आणि चौथ्या बोटात घातली जाते. यामुळे ते हातात बसते. यानंतर, हल्ला केल्यावर समोरच्या व्यक्तीला रक्तस्त्राव होतो. यातून कुणाचा खूनही होऊ शकतो. असे म्हणतात की, शिवाजी महाराज हे खास शस्त्र आपल्या सुरक्षिततेसाठी नेहमी स्वतः जवळ ठेवायचे.
शिवाजी महाराजांची वाघनखे भारतातून ब्रिटनपर्यंत कशी पोहोचली?
एका वृत्तानुसार, शिवाजी महाराजांचे हे खास शस्त्र स्वातंत्र्यापूर्वी मराठा राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होते. इंग्रज भारतात आल्यानंतर मराठा पेशव्यांच्या पंतप्रधानांनी ते ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी जेम्स ग्रँट डुप यांना भेट म्हणून दिले. यानंतर, जेव्हा अधिकारी 1824 मध्ये ब्रिटनला पोहोचले, तेव्हा त्यांनी ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दान केले. तेव्हापासून ते तिथेच आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT