मापात पाप! पेट्रोल पंपावर असंही फसवू शकतात, इथे ठेवा लक्ष
कार अथवा तुमच्या दुचाकीमध्ये इंधन टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला तर तेथील कर्मचारी तुम्हाला शून्य पाहण्यासाठी सांगतात. त्यानंतर तुम्ही शून्य पाहून झाल्यावर पुन्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही, आणि तिथेच आपली फसवणूक होते. कारण मीटरमध्ये फक्त बदलणारे आकडे दिसतात, पण आपल्या वाहनात इंधन किती पडते त्याचा तुम्हाला कधीच अंदाज येत नाही.
ADVERTISEMENT
Car-Bike: तुम्ही कार किंवा बाईक वापरत असाल तर तुम्हाला रोज पेट्रोल पंपावर (Petrol Pump) जावे लागत असते. मात्र वाहनामध्ये पेट्रोल किंवा इंधन टाकत असताना तुम्ही नेहमीच सावध राहिले पाहिजे. कारण पेट्रोल पंपावर तुमची कधीही फसवणूक (fraud) होण्याची शक्यता असते. कारण पेट्रोल पंपावर इंधन टाकताना तो सगळा तुमच्या सर्व डोळ्यांचा खेळ आहे. त्यामुळे तुम्ही या फसवणुकीपासून वाचूही शकता. त्यामुळे पेट्रोल पंपावर मीटरमध्ये कशी प्रकारे मीटरमध्ये (meter) छेडछाड केली जाते त्याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
‘शून्य’ पाहून समाधानी होऊ नका
जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचता, तेव्हा इंधन भरण्यापूर्वी कर्मचारी तुम्हाला मीटरमध्ये शून्य पाहण्याची विनंती करता. तो शून्य पाहून तुम्हाला समाधानी होता. कारमध्ये संपूर्ण पेट्रोल किंवा डिझेल भरले असले तरी प्रत्यक्षात मात्र मीटरच्या माध्यमातून तुमचीही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे मीटरमध्ये असलेल्या डिस्प्लेवर तुम्ही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
स्क्रीनवर सगळीच माहिती
ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा खेळ टाकलेल्या पेट्रोल-डिझेलच्या शुद्धतेबाबतही आहे. ज्यामध्ये फेरफार करून तुमचीही फसवणूक होऊ शकते. पेट्रोल पंपाच्या मशिनमध्ये, किती रुपये किंमतीचे पेट्रोल भरले आणि किती पेट्रोल वेगवेगळ्या टाकले आहे हा सगळा डेटा तुम्ही सहज पाहू शकता. कारण त्या मशीनच्या स्क्रीनवर सगळीच माहिती दिलेली असते. ती थेट गुणवत्ता म्हणजेच इंधनाच्या शुद्धतेविषयीही माहिती देते. त्यामुळे तुमच्यावर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकताना फसवणूक होत असेल तर त्यापासून तुम्ही वाचू शकता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Rajasthan: ‘तात्काळ Non Veg चे ठेले बंद करा’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्याला फोन
मीटरमध्ये छेडछाड
पेट्रोल पंपांवर ज्या प्रमाणे ठराविक मीटर असते त्यामध्ये छेडछाड करून फसवणूक केली जाते. जर आपण स्पष्ट शब्दात ती समजून घेतली नाही तर त्यामध्ये तुमची फसवणूक ही होतच असते. पंपावरील इंधनमध्ये विशिष्ट प्रमाणात घटक मिसळून उत्पादन तयार केले जाते तेव्हा त्या पदार्थाच्या आधारेच त्या पदार्थाचा विशिष्ट दर्जा ठरवला जातो. त्यामध्ये थोडीफार तफावत असल्यास त्यामध्ये भेसळ झाल्याचे असल्याचे कळते. पेट्रोलची घनता 730 ते 800 किलोग्रॅम प्रति घनमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर डिझेलबद्दलची ही घनता 830 ते 900 किलोग्रॅम प्रति घनमीटरवर निश्चित केली जाते.
जंप ट्रिकने होऊ शकते फसवणूक
पेट्रोल पंपावर इंधनाची पातळी कमी असल्याच्या तक्रारी अनेकदा पाहायला मिळत असतो. मात्र याठिकाणी होत असलेल्या फसवणुकीकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे थेट ग्राहकांच्या खिशालाच कात्री लागत असते. मीटरबाबतही आणि ‘जंप ट्रिक’चादेखील तुम्ही बळी होऊ शकता. यामध्येही मीटर दाखवून फसवणूक केली जाते. मात्र ज्यावेळी तुम्हाला मीटरमध्ये शून्य दिसते तेव्हा तुम्ही पाहिले असेल की 0 पासून सुरू होणारे मीटर अचानक 5-6 रुपयांपर्यंत पोहोचते, मधले 2-3-4 दिसतच नाहीत. इथेच तुमच्याशी खेळ खेळला जातो, कारण शून्यापासून सुरुवात केल्यानंतर मीटर टप्प्याटप्प्याने रु. 1-2-3 नुसार वाढणे गरजेचे असते.
ADVERTISEMENT
इथेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे
या दोन पद्धतींव्यतिरिक्त, पेट्रोल पंपावरील फसवणूक टाळण्यासाठी आणखी एका ठिकाणी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या वाहनात पेट्रोल किंवा डिझेल टाकणाऱ्या नोजलबद्दल तुम्हाला आम्ही सांगत आहोत. कारण याठिकाणीही तुमची फसवणूक होऊ शकते. पेट्रोल पंपावरील नोजल ऑटो कट करण्याऐवजी मॅन्युअल असल्यास, कर्मचाऱ्याकडून त्यामध्ये छेडछाड केली जाते. त्यामुळेही तुमची फसवणूक केली जाते. त्यामुळे असा प्रकार समोर आल्यास 10002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. या तक्रारीच्या आधारे तपासणीमध्ये अनियमितता आढळून आल्यास कोणताही पंपाचा परवानाही रद्द होऊ शकतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 13 नागरिक जागीच ठार
ADVERTISEMENT